Uddhav Thackeray Twitter/ @ANI
महाराष्ट्र

'जर माझ्या शिवसैनिकांवर अन्याय कराल तर याद राखा...,' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray: शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच होणारा दसरा मेळावा एकदम जोरदार होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

Uddhav Thackeray: शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच होणारा दसरा मेळावा एकदम जोरदार होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. ठाकरे गटाकडून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे हे प्रमुख वक्ते असल्याचे सांगण्यात आले होते. तर दुसरीकडे, शिंदे गटाकडून राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील आणि सांगोलाचे आमदार शहाजीबापू पाटील वक्ते असल्याचे सांगण्यात आले होते. यंदाच्या दसरा मेळाव्यावर आपल्या भाषणाची छाप कोण पाडणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, 'विजयादशमीच्या शुभेच्छा देत असताना असा अभूतपूर्व दसरा मेळावा पहिल्यांदाच होत आहे. दसरा मेळाव्यासाठी जमा झालेली ही अलोट गर्दी ही कोरडी गर्दी नाही. हा खरा शिवसैनिक आहे. शिवसेनेच्या सैनिकापुढे नतमस्तक झाल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. मात्र, आज शिवसेनेत मोठी गद्दारी झालीये. इथे आलेल्या शिवसैनिकाला कोणीही जबरदस्तीने आणलेले नाही.'

उद्धव ठाकरे म्हणाले की, 'दरवर्षी दसऱ्याला परंपरेनुसार आपण रावणाचे दहन करतो. मात्र यावर्षीचा रावण वेगळा आहे. ज्यावेळी मी रुग्णालयात होतो, त्यावेळी माझ्याच सहकाऱ्यांनी पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली. ज्यांना शिवसेनेने सगळं काही दिलं त्यांनीच अखेर शिवेसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, यामध्ये अनेकजण नाराज झाले. दुसरीकडे, राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी का करावी लागली? याचं उत्तर खरं तर भाजपने द्यावं. मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या (Shiv Sena) पाठीत खंजीर खुपसला. विद्यमान मुख्यमंत्र्यांना आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय, आहे त्यांची लायकी? बाप चोरणारी लोकं आता महाराष्ट्राच्या रस्त्या-रस्त्यावर फिरत आहेत.'

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, 'राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं सांगितलं होतं, पण पुन्हा आल्यानंतर उपमुख्यमंत्री होतील असं वाटलं नव्हतं. मात्र आता राज्यात कायद्याचा दुरुपयोग होत चालला आहे. सूड उगवण्यासाठी राजकीय नेत्यांना धमकावलं जात आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्वाच्या नावाखाली डोक्यावरचं लोणी खाणारी ही भाजपची जात आहे.'

उद्धव ठाकरे पुढे असेही म्हणाले की, राज्याबरोबर, देशातील महागाईवर बोलण्यासाठी या लोकांची दातखिळी बसते. महागाईवर हे लोक एक चकार शब्द बोलत नाहीत. तसेच, दसरा मेळावा हे हिंदुत्वाचं पावित्र आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा गृहमंत्री आहेत की, भाजपचे घरगुती मंत्री आहेत हे काही ठरत नाही? राज्या-राज्यामधील सरकारे पाडण्याचा चंगचं त्यांनी बांधला आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने ताकद दाखवयाची असेल तर चीनकडून आपल्या हक्काची जमीन घेऊन दाखवा, आहे का हिम्मत?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Tara Sutaria Breakup: तारा सुतारिया आणि वीर पहाडियाचे ब्रेकअप? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नात्यात दुरावा Watch Video

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT