Maharashtra Politics: उध्दव ठाकरेंना जोर का झटका! आमदारानंतर आता खासदारांची बंडखोरी

Maharashtra Political News: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढतच आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. पहिल्यांदा हातून सत्ता गेली, तर आता पक्ष वाचवण्याची धडपड सुरु आहे. ज्यामध्ये रोज नवा ट्विस्ट येत आहे. आता एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे गटाने जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली. शिवसेनेच्या प्रमुख नेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख पदाला तूर्तास हात लावण्यात आलेला नाही. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या उपनेतेपदी यशवंत यादव गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंखे, तानाजी सावंत, विनय नाहाटा, शिवाजीराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, रामदास कदमांची शिवसेनेला सोडचिठ्ठी

शिंदे गटाच्या बैठकीला शिवसेनेचे अनेक खासदार उपस्थित होते

याशिवाय, मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बैठकीत शिवसेनेचे 13-14 खासदार ऑनलाइन हजर झाल्याचेही सूत्रांच्या हवाल्याने वृत्त आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच शिवसेनेचे 55 आमदार दोन गटात विभागले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला 40 आमदारांचा पाठिंबा आहे, तर 15 आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्याचवेळी आता शिंदे गटाने 12-14 खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठकही घेतली

आठवडाभरापूर्वी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात ही बैठक झाली. शिवसेनेच्या बहुतांश खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. या बैठकीला शिवसेनेचे 18 पैकी 13 लोकसभा सदस्य उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानी झालेल्या बैठकीला 18 पैकी 15 लोकसभा सदस्य उपस्थित असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता.

Uddhav Thackeray
Maharashtra Political Crisis: शिंदे गटाच्या बंडखोरीपासून ते सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील महत्वाचे मुद्दे

खासदारांच्या सूचनेनंतर द्रौपदी मुर्मूला पाठिंबा जाहीर करण्यात आला

मात्र, खासदारांच्या सूचनेनंतर उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. आधीच बंडखोर आमदारांमुळे उद्धव ठाकरेंच्या हातातून सत्ता गेली आहे. त्यामुळेच त्यांना आता पक्ष वाचवण्यासाठी खासदारांचा पाठिंबा हवा आहे. महाराष्ट्रातील 18 लोकसभा खासदारांव्यतिरिक्त कलाबेन डेलकर या दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातून शिवसेनेच्या खासदार आहेत. त्याचवेळी राज्यसभेत शिवसेनेचेही तीन खासदार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com