मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोडला 'वर्षा' बंगला

महाराष्ट्रातील राजकारण मागील दोन दिवसांपासून शिवसेनेतील बंडाळीमुळे चांगलंच गाजत आहे.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray
Maharashtra Chief Minister Uddhav ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले सरकारी निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या पक्षाचा एकही आमदार आपल्या विरोधात असेल तर आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत, अशी घोषणा स्वतः उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हमध्ये केली होती. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' सोडण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. (maharashtra cm uddhav thackeray leaves his official residence varsha to matoshri)

दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सोडून मातोश्री निवासस्थानाकडे रवाना झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्री मातोश्रीवरुनच सरकारी कामकाज पाहतील. मात्र, त्यांनी अद्याप मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र तेजस ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शासकीय निवासस्थान सोडून मातोश्री निवासस्थानाकडे रवाना झाले.

Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray
'मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे...': मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

तत्पूर्वी, बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करणाऱ्या बंडखोर आमदारांना सामंजस्याची ऑफर दिली होती.

Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत दिवाळीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार

उध्दव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून म्हणाले, ''भाजपपासून (BJP) फारकत घेऊन आपण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती करत तीन पक्षांचं सरकार स्थापन केलं. मात्र आता जे काही राज्यात सुरु आहे, ते पाहून धक्का बसला आहे. शरद पवारांच्या आग्रखातर मी राज्याचा मुख्यमंत्री बनलो. मात्र आता माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर मी राजीनामा देऊन टाकतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी मुलगा आहे. मला कोणत्याही पदाचा, प्रतिष्ठेचा मोह नाही. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मी माझा मुक्काम वर्षातून मातोश्रीवर हालवतो. जोपर्यंत माझ्याबरोबर शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसैनिक आहेत तोपर्यंत मी काम करत राहीन. यामध्ये माझी कोणत्याही प्रकारची आगतिकता नाही.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com