Maharashtra Politics Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अखेर मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधूंचे मनोमीलन! 5 जुलैला एकाच व्यासपीठावर दिसणार राज-उद्धव

Raj - Uddhav Thackeray: महाराष्ट्राला या मोर्च्याच्या निमित्ताने पाच जुलै रोजी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Sameer Amunekar

मुंबई: ‘मराठी’च्या मुद्यावरून ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झाले आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे भाऊ तब्बल अठरा वर्षांनंतर प्रथमच प्राथमिक शिक्षणातील त्रिभाषा सूत्राच्या विरोधात एकत्रितपणे रस्त्यावर उतरणार आहेत.

या दोन्ही बंधूंनी युतीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल मानले जात आहे. महाराष्ट्राला या मोर्च्याच्या निमित्ताने पाच जुलै रोजी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उद्धव ठाकरे यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी यापूर्वी सात जुलै ही तारीख जाहीर केली होती तर राज ठाकरे यांनीही सहाच्या ऐवजी पाच जुलैच्या दिवशी मोर्चा काढण्याची तयारी दर्शविली आहे.

आता दोन्ही भावांनी एक एक पाऊल मागे येत पाच जुलै ही तारीख निश्चित केली आहे. यासंदर्भात राज यांनीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना फोन करून दोन मोर्चांऐवजी एकच मोर्चा काढावा त्यामुळे मराठी माणसाची एकजूट दिसून येईल असे सुचविले होते.

उद्धव यांनी मोर्चात सहभागी व्हावे किंवा पाच जुलै रोजी दोन्ही पक्षांनी एकत्र आंदोलन करावे असा प्रस्तावही त्यांच्याकडून देण्यात आला होता. अखेरीस दोन्ही पक्षांत पाच जुलैच्या तारखेवर मतैक्य झाल्याचे समजते. ‘‘ हिंदी भाषेला आमचा विरोध नाही. मात्र, शालेय शिक्षणात अशाप्रकारे भाषेची सक्ती करता येणार नाही. गुजरातला नेहमीप्रमाणे या सक्तीतून वगळण्यात आले आहे. या सक्तीविरोधात राज्यात वातावरण तापत आहे. सरकारही त्यांच्याकडून सादरीकरण करत आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची असून इतर भाषांचे पर्याय देण्यात यावेत ही महायुती सरकारची स्पष्ट भूमिका आहे. सरकारच्यावतीने वारंवार ही भूमिका मांडूनही विरोधक मात्र याबाबत अपप्रचार करत आहेत. - रवींद्र चव्हाण, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT