Goa News: ढवळी येथील भगवती मंदिरासमोरील रस्त्यावर धावत्या कारला आग; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी
ढवळी येथील भगवती मंदिरासमोरील रस्त्यावर धावत्या कारला आग
ढवळी येथील भगवती मंदिर समोरील रस्त्यावर धावत्या कारला आग. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली.
Supriy Desai: सत्तारीच्या सुप्रिया देसाईने जिंकला मिस इंडिया फॅब्युलस रॉयल ग्लोबल क्वीन 2025चा किताब
एमराल्ड क्लब येथे अलीकडेच झालेल्या मिस इंडिया फॅब्युलस रॉयल ग्लोबल क्वीन २०२५ या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत गोव्याच्या होंडा सत्तारीतील सुप्रिया देसाईने बाजी मारली आहे. देशभरातून आलेल्या स्पर्धकांमध्ये उत्कृष्ट आत्मविश्वास, सौंदर्य, आणि व्यक्तिमत्व दाखवत तिने हा किताब पटकावला.
Jagannath Rath Yatra: जगन्नाथ रथयात्रा आजपासून सुरू
भारतातील सर्वात प्रसिद्ध उत्सवांपैकी एक पुरी जगन्नाथ रथयात्रा आजपासून सुरू झाली आहे. जगभरातून हजारो भाविक या उत्सवासाठी येथे उपस्थित आहेत. यामध्ये भगवान जगन्नाथ यांची भव्य मिरवणूक काढली जाते.
tree collapse on house: नागझर- कुर्टीमध्ये माड कोसळून घराचे मोठे नुकसान
नागझर- कुर्टी येथे सीताराम नाईक यांच्या घरावर अचानक एक मोठा माड कोसळल्याची घटना घडली असून या घटनेत अंदाजे १ लाख रुपये पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कोसळलेला माड सुरक्षितपणे बाजूला केला. माड कोसळल्यानंतर घराच्या छताचे व भिंतीचे मोठे नुकसान झाले आहे.
गोव्यातील जुन्या, जीर्ण, सोडून दिलेल्या, वापरासाठी असुरक्षित इमारती पाडण्याचे आदेश
गोव्यातील जुन्या, जीर्ण, सोडून दिलेल्या, वापरासाठी असुरक्षित इमारतींची तपासणी करुन मालकांना सूचना देण्याचे निर्देश महसूल खात्याने दिले आहेत. गरज पडल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकार वापरुन इमरती पाडव्यात असेही आदेशात म्हटले आहे.
युरोपातील दोन, आफ्रीकेतील एकाला पेडण्यातून अटक; बेकादेशीर वास्तव्य प्रकरण
बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी युरोपातील दोन आणि आफ्रिकेतील एकाला पेडणे पोलिसांनी अटक केली आहे. तिघांवर विदेशी कायदा १९४६ च्या कलम १४(अ) आणि १४ (ब) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक तुकाराम चोडणकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.