Maharashtra CM Uddhav Thackeray and Yogi Adityanath  Dainik Gomantak
महाराष्ट्र

देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे! योगी आदित्यनाथ यादीतून बाहेर

विशेष म्हणजे कामाच्या आधारे ठरलेल्या देशातील पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपच्या (BJP) एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही.

दैनिक गोमन्तक

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश होण्याचा मान मिळाला आहे. मूड ऑफ द नेशन अंतर्गत एका एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आले आहेत. देशाचा मूड जाणून घेण्यासाठी वर्षातून दोनदा अशा प्रकारचे सर्वेक्षण केले जाते. मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारे हे निकाल निश्चित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कामाच्या आधारे ठरलेल्या देशातील पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपच्या (BJP) एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही.

सर्वेक्षणाच्या निकालानुसार मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारे देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर आहेत आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. स्टॅलिन, चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पाचव्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आहेत. ओडिशामध्ये बिजू जनता दल, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूमध्ये द्रमुक, महाराष्ट्रात तीनही पक्षांची महाविकास आघाडी सरकार आणि केरळमध्ये वामपंथी लोकशाही आघाडीचे सरकार आहे.

भाजपच्या चिंतेत वाढ

या सर्वेक्षणानुसार ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता आणि त्यांचे काम लोकांना आवडले आहे, ते पाहता भाजपला चिंता वाटणे स्वाभाविक आहे. कारण महापालिका निवडणुकीत भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेना या सर्वेक्षणाच्या निकालाचा जोरदार प्रचार करणार आहे.

सातव्या क्रमांकावर भाजप

सर्वेक्षणानुसार, भाजप टॉप-9 मध्ये सातव्या क्रमांकावर आहे. सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सातव्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा, आठव्या क्रमांकावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि नवव्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आहेत.

योगी आदित्यनाथ यादीतून बाहेर

गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना 40% पेक्षा कमी रेटिंग मिळाले आहे. सर्वेक्षणात लोकप्रियतेच्या बाबतीत पहिला क्रमांक मिळवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कामाच्या बाबतीत पहिल्या नऊ मुख्यमंत्र्यांच्या यादीतून बाहेर आहेत ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकप्रियता आणि कामगिरी या दोन्ही यादीत पहिल्या पाचमध्ये आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

SCROLL FOR NEXT