बुल्ली बाय अ‍ॅप प्रकरणातील आरोपींचा न्यायालयाने जामीन नाकारला

'बुल्ली बाय' अॅप प्रकरणाशी संबंधित आरोपींना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
Bulli Bai App Case
Bulli Bai App CaseDainik Gomantak
Published on
Updated on

'बुल्ली बाय' अॅप प्रकरणाशी संबंधित आरोपींना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज वांद्रे न्यायालयाने फेटाळला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींमध्ये विशाल कुमार झा, श्वेता सिंग आणि मयंक रावत यांचा समावेश आहे.

Bulli Bai App Case
Weather Alert! महाराष्ट्रात येत्या 3 दिवसात 'या' जिल्ह्यामध्ये बरसणार सरी

यापूर्वी, पोलिसांनी त्यांच्या जामिनाला विरोध केला होता, असा दावा करण्यात आला होता की आरोपींनी समाजातील शांतता भंग करण्याच्या उद्देशाने त्यांच्या सोशल मीडिया खात्यांसाठी शीख समुदायाशी संबंधित नावे वापरली होती. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, तिन्ही आरोपी ट्विटर, इंस्टाग्राम आणि जीमेलवर अनेक सोशल मीडिया खाती चालवत होते. सायबर सेलने म्हटले आहे की अपमानजनक मजकूर पोस्ट करणारी अनेक खाती काढून टाकण्यात आली आहेत आणि या संदर्भात माहिती गोळा करणे बाकी आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ओडिशातून (Odisha) आणखी एका आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी आरोपी नीरज सिंगला मुंबईच्या सायबर सेलने अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत नीरजची भूमिका समोर आली होती. चौकशीनंतर सायबर पोलिस स्टेशनचे एक पथक त्यांच्या अटकेसाठी ओडिशात पाठवण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, नीरज सिंग हा एमबीए पदवीधारक आहे.

Bulli Bai App Case
'भूमिका साकारल्यामुळे त्यांचे विचार तसे असतीलच असे नाही': शरद पवार

'बुल्ली बाय' अॅपवर (Bulli Bai App) टार्गेट करण्यात आलेल्या महिलांच्या तक्रारींनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली आहे. अॅपमध्ये अनेक मुस्लिम महिलांची माहिती सार्वजनिक करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी चौकशीसाठी नीरज बिश्नोई आणि ओंकारेश्वर ठाकूर या आणखी दोघांना गुरुवारी 'ट्रान्झिट रिमांड'वर मुंबईत आणण्यात आले. या दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.

दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या 'बुल्ली बाय' अॅपशी संबंधित आणखी एका प्रकरणात बिश्नोईला अटक करण्यात आली होती, तर ठाकूरला 'सुली डील' अॅप प्रकरणात अटक करण्यात आली होती. बिश्नोईला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आसाममधून (Assam) अटक केली असून तो 'बुल्ली बाई' अॅपचा मुख्य निर्माता असल्याचा दावा करतो. बिश्नोई आणि ठाकूर यांना वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Bulli Bai App Case
जर्मन नौसेनेची फ्रिगेट बायर्न F217 युद्धनौका आज मुंबईत दाखल

गिटहब' या ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मवर 'बुल्ली बाई' अॅपवर शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो मॉर्फ करून 'लिलावासाठी' ठेवल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. अॅपवर प्रत्यक्ष 'लिलाव' किंवा 'विक्री' केली गेली नसली तरी, असे मानले जाते की त्याच्या निर्मितीचा मुख्य उद्देश लक्ष्यित महिलांना धमकावणे आणि अपमानित करणे हा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com