Ruby Clinik Dainik Gomantak
महाराष्ट्र

पुण्यातील किडनी तस्करीचा प्रकार उघड; महिलेने केली तक्रार

रुबी हॉल क्लिनिक प्रमुख परवेझ ग्रांट याच्यासह सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

पुण्यात किडनी तस्करी प्रकरणातून झालेल्या प्रकरणात रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह हॉस्पिटलमधील सहा डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ज्या महिलेची किडनी काढण्यात आली त्या महिलेने कागदांची फेरफार केल्याचं निदर्शनास आल्यावर पोलीसांनी तीच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने याआधी कारवाई करत रूबी हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला होता.

दाखल झालेल्या तक्रारीनुसार सारिका सुतार नावाच्या महिलेची फसवणूक करून तिची किडनी काढल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलीसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. या चौकशीत पोलीसांना सारिका सुतार या महिलेची 15 लाख रुपयांच्या बदल्यात किडनी काढून दुसऱ्या व्यक्तीला बसवण्याचे ठरले होते.

मात्र तीची या प्रकरणात फसवणुक झाल्याने ही तक्रार दाखल केली आहे. या व्यवहारात तीला 15 लाख रु ऐवजी केवळ 4 लाख मिळाल्याने तीने ही तक्रार दाखल केली आहे. या व्यवहारात रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर आणि व्यवस्थापनातील अधिकारी देखील त्यामधे सहभागी असल्याच पोलीसांना चौकशीत आढळून आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT