Mumbai-Goa Highway Traffic Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, परतीच्या प्रवासासाठी निघालेले चाकरमानी 'बेहाल'; ठिक-ठिकाणी चक्काजाम

Heavy Traffic On Mumbai-Goa Highway: कोकणात मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करुन मुंबईच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे.

Manish Jadhav

Traffic Jam On Mumbai Goa Highway After Holi

माणगाव: कोकणात मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करुन मुंबईच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. होळीनिमित्त मुंबई,पुणे, ठाणेमधून मोठ्याप्रमाणात कोकणवासीय आपल्या कुटुंबीयांसमवेत गावी गेले होते. सलग सुट्ट्यांचा आनंद घेवून परतीच्या प्रवासाला लागलेल्या या चाकरमान्यांना रायगडमधील माणगावात मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. महारामार्गावर लागलेल्या लांबच-लांब रांगांमुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा फटका

दरम्यान, कोकणात (Konkan) होळीचा आणि सुट्ट्यांचा आनंद घेवून परतणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही माणगावातील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी रविवारी (16 मार्च) महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र तरीही वाहतूक कोंडी झाल्याने चाकरमान्यांची दैना उडाली आहे. माणगावात कळमजे फाटा ते ढालघर फाट्यादरम्यान ही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

गावाकडे जातानाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला

दुसरीकडे, मुंबईहून (Mumbai) होळीसाठी गावाकडे जातानाही चाकरमान्यांचा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. रायगडमधील माणगावात महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या होत्या. माणगाव, इंदापूर, नागोठणे, वडकळ परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT