Aditya Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोकणासाठी पर्यटन आणि पर्यावरण दोन्ही महत्त्वाचे

मुंबईवरचा भगवा हा कोकणी माणसांमुळेच

दैनिक गोमन्तक

रत्नागिरी : राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. आज आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यात लांजा येथे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याला आपली उपस्थिती लावली. तसेच आपल्या भाषणात, कोकणासाठी पर्यटन आणि पर्यावरण हे दोन्ही महत्त्वाचे असून मुंबईवरचा भगवा हा कोकणी माणसांमुळेच असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात चौफेर राजकीय फटकेबाजी करताना थेट भाजपवर हल्ला चढवला. (Tourism and environment are important for Konkan says Environment and Tourism Minister Aditya Thackeray)

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. मात्र याच्याआधी असे का झाले नाही? हा विचार करण्याचा प्रश्न आहे. कोकणासाठी पर्यटन (Tourism) आणि पर्यावरण (Environment) दोन्ही महत्त्वाचे आहे. तर माझ्याकडे असणाऱ्या दोन्ही खात्यांचा वापर कोकणासाठी सर्वाधिक महत्वाची आहेत. तर कोकणावर सगळ्यात मोठा परिणाम हा वादळे, नैसर्गिक संकटे यांचा होत आहे.

तसेच पुढील पाच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सिंधुरत्न योजना राबवली जाईल. ज्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य असेल. कोकणात होम स्टे पॉलिसी आणणार असून स्थानिक भुमिपुत्रांना रोजगार कसा मिळेल यावर आपले लक्ष असेल. तर मुंबईवरचा (Mumbai) भगवा हा कोकणी माणसांमुळेच असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. त्याबरोबर त्यांनी, नाणारवर भाष्य करताना, नाणार प्रकल्प होणार नसल्याचे सांगत कुठलाही प्रकल्प हा स्थानिकांना विश्वासात घेवूनच करू असे आश्वासन कोकण वासियांना दिले आहे.

तसेच आदित्य ठाकरे यांनी कोकण (Kokan) विकासाच्या मुद्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यातील भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कुटुंबावर दबाव आणत आहेत. जर ते आपल्यावर अन्याय करत असतील तर मैत्रीचा विषय येतोच कुठे? असा सवाल उपस्थित केला. तसेच केंद्रातील भाजप (BJP) सरकार कडून बिगर भाजपी राज्यात राजकीय षडयंत्र सुरू आहे. तेथील सत्ता पालट करण्यासाठी आणि सत्ता घेण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. तर राज्यातील सत्ता हातातून गेल्यानेच नैराश्यातून येथे धाडीचे सत्र सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT