Vitthal Rukmini Vivah Dainik Gomantak
महाराष्ट्र

विठु रखुमाईच्या शाही विवाह सोहळ्याने दुमदुमली पंढरी

आज वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, निसर्गाचे सौदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठत असते आणि याच मुहूर्तावर परंपरेनुसार होत असतो देवाचा विवाह.

दैनिक गोमन्तक

आज वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, निसर्गाचे सौदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठत असते आणि याच मुहूर्तावर परंपरेनुसार होत असतो देवाचा विवाह. वर असतो साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि वधू असते आई रुक्मिणी. मग या देवाच्या लगीनघाईचे वेध पंधरा दिवसापासून पंढरपुरकरांना (Pandharpur) लागलेले असतात. हा मुहूर्त आज दुपारी बारा वाजता असल्याने विठ्ठल मंदिरात लगीनघाई सुरु आहे. सध्या कोरोनाचे (Corona) सावट असल्याने सुरु यावर्षी देखील कोरोनाचे नियम पाळून अगदी मोजक्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा अविस्मरणीय विवाह सोहळा संपन्न होत आहे.

यावर्षी संपूर्ण सभा मंडपात फुलांचा महाल करण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. पुणे येथील भाविक भारत भुजबळ हे दरवर्षी देवाच्या लग्नासाठी फुल सजावटीची सेवा देत असतात. गेले पंधरा दिवस 150 पेक्षा जास्त कारागीर या सजावटीची तयारी करण्यासाठी पुणे मध्ये झटत होते. काल सकाळी अकरा वाजल्यापासून या सजावटीला सुरुवात केली असून 60 कारागिरांनी रात्री 11 पर्यंत ही लग्न सोहळ्याची सजावट पूर्ण केली आहे.

लग्नस्थळ असणाऱ्या विठ्ठल सभा मंडपात सात प्रकारच्या फुलांनी महाल सजला आहे. यामध्ये लाल, पिवळा झेंडू, अष्टर, पांढरी शेवंती, पांढरी डिफ़री अँथोरियमसह इतर पाना फुलांचा वापर केला गेला आहे. याशिवायच लग्न मंडपासमोर फुलांचे द्वारपाल तयार केले आहेत. नामदेव पायरी समोर फुलांची विठ्ठल रुक्मिणी केली असून लग्न सोहळ्यातील मंगल वाद्यांची आकर्षक फुल सजावट केली आहे.

या लग्न सोहळ्यासाठी 20 प्रकारची देशी विदेशी अशी 6 टन फुले आणण्यात आली असून यात 9 रंगांच्या शेवंती, 6 प्रकारचे गुलाब यांचा वापर करुन विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजावटीसाठी केला जाणार आहे.

या लग्न सोहळ्यासाठी देवाला पांढऱ्या रंगाची रेशमी अंगी, पांढऱ्या रंगाचे धोतर तर रुक्मिणी मातेला पांढऱ्या रंगाची रेशमी नऊवारी साडी असा पोशाख परिधान करण्यात आला आहे. रुक्मिणी मातेलाही सिल्कची कांजीवरम साडी निवडण्यात आली आहे. तसे दरवर्षी देवाचा पोशाख खास असला तरी यंदा तो फॅशन डिझायनरने बनवून अर्पण केल्याने पहिल्यांदाच देवाला असा खास बनविलेला पोशाख विवाहात घातला जाणार आहे. या शाही विवाहाची कथा भागवताचार्य अनुराधाताई शेटे सांगणार असून उद्या कथेच्या विवाहप्रसंगी दुपारी बारा वाजता देवाच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT