संतोष परब प्रकरण अन् नितेश राणेंचं गोवा कनेक्शन काय?

संतोष परब हल्ला प्रकरणात कणकवली पोलिसांनी नितेश राणेंना समन्स बजावला होता. मात्र नितेश राणे हे गायब होते.
Nitesh Rane Police Custody
Nitesh Rane Police CustodyDainik Gomantak
Published on
Updated on

बहूचर्चित अस्या शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे हे कालच पोलीसांना शरण आले आहेत. तर कोर्टाने नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश राणेंची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. तत्पूर्वी संतोष परब यांच्या हल्ल्याप्रकरणी सुरूवातिला आज सकाळी पोलिसांनी राकेश परब आणि नितेश राणेंची (Nitesh Rane) अमोरासमोर चौकशी केली.

(Nitesh Rane Police Custody)

Nitesh Rane Police Custody
महाराष्ट्रातील मुलींची पहिली सैनिकी शाळा लढतेय लिंगभेदाविरुद्ध

नंतर नितेश राणेंना वेगवेगळ्या ठिकाणी नेत पोलिसांनी त्यांची तब्बल पाच तास चौकशी केली. ही चौकशी झाल्यानंतर नितेश राणेंना मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्यात नेले व तेथील हॉटेलचाहीपोलिसांनी तपास केला. त्यामुळे संतोष परब हल्ला प्रकरणाचं नेमकं कनेक्शन गोव्यात आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. शिवाय नितेश राणेंना कोठडी मिळाल्यापासून राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे.

गोव्यात पोलिसांच्या हाती काय लागणार?

संतोष परब हल्ला प्रकरणात कणकवली पोलिसांनी नितेश राणेंना समन्स बजावला होता. मात्र नितेश राणे हे गायब होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी कणकवली पोलिसांनी गोवा, मुंबई आणि सिंधुदुर्ग येथे शोध सुध्दा घेतला होता. पण नितेश राणे हे कुठे होते? याबाबत कोणालाच माहीत नव्हते. राणेंनी याबाबत वक्तव्य केल्याने राणेंनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नितेश राणे हे सर्वासमोर आले नव्हते. मात्र ते गोव्यात लपून बसल्याचा असा संशय सुध्दा होता. आता नितेश राणे हे शरण आल्यामुळे नितेश राणे हे कुठे होते? गोव्यात (Goa) असतील तर तिथे काय करत होते? या सर्वांची उकल पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांनी कोर्टाला दहा दिवस कस्टडी देण्याची विनंती केली होती, मात्र कोर्टाने नितेश राणे यांना दोनच दिवसांची कोठडी दिली. पोलिसांकडे कमी वेळ असल्याने पोलिसांनी तातडीने सुत्रं हलवण्यास सुरूवात केली आहे. सकाळी सावंतवाडी पोलीस ठाण्यातून नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यात पोलिसांच्या हाती आणखी काही महत्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवा, महाराष्ट्र आणि नितेश राणे या तपासात पोलीस आणखी काय माहिती हाती लागते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com