Nashik ST Bus Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Nashik: भरधाव एसटी बसने 3 ते 4 दुचाकीस्वारांना चिरडले, बसही पेटली; तीन जणांचा मृत्यू

नाशिक-सिन्नर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.

Pramod Yadav

Nashik ST Bus Accident: एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडल्याने यात दोन ते तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक-सिन्नर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला, यानंतर एसटी बसने देखील पेट घेतला. अशी अपघाताची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाका परिसरात दोन तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातानंतर बसने पेट घेतला. या भयंकर अपघातात दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून अपघात झाल्यानंतर काही क्षणातच एसटी बस आगीत भस्मसात झाली.

दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून यंत्रणेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

Viral Video: रस्त्याच्या मधोमध सांडांची WWE स्टाईल फाईट! स्कूटीवरुन जाणारी तरुणी सापडली कचाट्यात; थरारक व्हिडिओ व्हायरल

Goa News: चर्चमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करा; आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांची मागणी

Goa Assmbly Live: लाटंबार्से औद्योगिक वसाहतीसाठी 38 कोटींचे वीज उपकेंद्र तातडीने उभारा; आमदार चंद्रकांत शेट्ये यांची सरकारकडे मागणी

Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये वाढता रक्तदाब ठरु शकतो जीवघेणा! आई आणि बाळासाठी धोक्याची घंटा; जाणून घ्या 'प्री-एक्लेम्पसिया'ची लक्षणे

SCROLL FOR NEXT