Konkan Rain Update: कोकणात दोन दिवस पावसाची शक्यता, 'मंदोस' चक्रीवादळाचा परिणाम

आज आणि उद्या कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Rain Update
Rain UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे 'मंदोस' (Cyclone Mandous) हे चक्रीवादळ तामिळनाडूची किनारपट्टी आणि पदुच्चेरीच्या उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ मुंबईसह कोकणमधून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण असून, आज आणि उद्या (08, 09 डिसेंबर) कोकणात (Konkan) पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Rain Update
Maharashtra Karnataka Border Dispute: प्रवाशांची होणार गैरसोय, सीमावादानंतर महाराष्ट्र एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

मंदोस चक्रीवादळामुळं तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता आहे. तामिळनाडू (Tamilnadu) आणि पुद्दुचेरीमध्ये (Puducherry) मध्यम ते जोरदार पावसाचा (Rain) अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होणार आहे.

Rain Update
Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहन घ्यायचा विचार करताय? थोडं थांबा, आधी हे वाचा

काय आहे 'मंदोस' चक्रीवादळ?

बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे बुधवारी चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाला 'मंदोस' असे नाव देण्यात आले आहे. मंदोस चक्रीवादळ 08 तारखेला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येण्याची शक्यता आहे. तामिळनाडूच्या 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात 08 व 09 तर मध्य महाराष्ट्रात 09 तारखेला हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com