Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

Shimga Festival Extra Buses For konkan: कोकणचा निसर्ग आणि तिथला 'शिमगा' म्हणजेच होळीचा सण म्हणजे चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय.
Shimga Extra Buses For konkan
Shimga Extra Buses For konkanDainik Gomantak
Published on
Updated on

ठाणे: कोकणचा निसर्ग आणि तिथला 'शिमगा' म्हणजेच होळीचा सण म्हणजे चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या उत्सवासाठी गावी जाणाऱ्या भक्तांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा (MSRTC) ठाणे विभाग सज्ज झाला आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी एसटीने ७५ जादा गाड्या सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वेच्या वेटिंग लिस्ट आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी भाड्यापासून चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

'लालपरी' धावणार कोकणच्या दिशेने

ठाणे, कल्याण, डोंबिवली, दिवा आणि कळवा यांसारख्या शहरी भागांत कामानिमित्त स्थायिक झालेला कोकणी माणूस सण-उत्सवासाठी हमखास गावी जातो. या प्रवाशांच्या सेवेसाठी ठाणे विभागातील विविध आगारांतून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रामुख्याने दापोली, खेड, चिपळूण, गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील महाड या मार्गांवर या विशेष गाड्या धावणार आहेत. रेल्वेतील गर्दी आणि धकाधकीचा प्रवास टाळण्यासाठी कोकणवासीयांनी यंदाही हक्काच्या 'लालपरी'लाच पहिली पसंती दिली आहे.

Shimga Extra Buses For konkan
Goa Tourism: गोव्यातला 'स्वर्ग...'! शॉपिंग, बीच शॅक्स अन् अथांग सागराचं लावण्य अनुभवायचयं; 'हा' समुद्रकिनारा तुमच्यासाठी बेस्ट

महिला आणि ज्येष्ठांना सवलत

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी केवळ गाड्यांची संख्याच वाढवली नाही, तर शासनाने जाहीर केलेल्या सवलतींची अंमलबजावणीही कडक केली आहे. 'महिला सन्मान योजने'अंतर्गत महिला प्रवाशांना तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे.

तसेच, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना परवडणाऱ्या दरात गावी जाणे शक्य होणार आहे.

Shimga Extra Buses For konkan
Goa Salt History: 1878चा ब्रिटिश-पोर्तुगीज तह होईपर्यंत गोव्यात 700 च्या वर मिठागरे होती; अस्तित्वाची जाणीव हीच खरी श्रीमंती

रेल्वेतून होणारी रेटारेटी आणि अवैध खासगी वाहतुकीचा धोका टाळण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या चालक आणि वाहकांना विशेष सूचना दिल्या आहेत. "चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप व्हावा आणि त्यांनी शिमग्याचा आनंद उत्साहात साजरा करावा, हाच आमचा उद्देश आहे," असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. ७५ जादा गाड्यांमुळे ऐनवेळी होणारी प्रवाशांची गैरसोय टळणार असून, 'लालपरी' खऱ्या अर्थाने कोकणवासीयांची जीवनवाहिनी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com