Maharashtra Karnataka Border Dispute: प्रवाशांची होणार गैरसोय, सीमावादानंतर महाराष्ट्र एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

विविध वादग्रस्त विधाने करून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई वादाला खतपाणी घालत आहेत.
Maharashtra-Karnataka border dispute
Maharashtra-Karnataka border disputeDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. बेळगावमध्ये आक्रमक झालेल्या कन्नड भाषिक नागरिकांनी महाराष्ट्रातील गाड्यांच्या नंबरप्लेटची तोडफोड केली. तसेच, महाराष्ट्रात देखील तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. सीमावादाचा प्रश्न चिघळला असताना, महाराष्ट्र एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला असून, यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Maharashtra-Karnataka border dispute
Maharsahtra-Karnataka Border Dispute​: तर आमचं उत्तर पण...सीमाप्रश्नावरून राज ठाकरेंचा कर्नाटकला इशारा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने कर्नाटकात जाणाऱ्या 382 फेऱ्या अंशत: रद्द केल्या आहेत. महाराष्ट्रातून कर्नाटकात दररोज 1 हजार 156 फेऱ्या नियोजित असतात. महाराष्ट्रातून नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून कर्नाटकात जात असतात. सर्वात जास्त वाहतूक होणाऱ्या कोल्हापुरातून निपाणी-बेळगावमार्गे जाणाऱ्या 572 फेऱ्यांपैकी 312 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Maharashtra-Karnataka border dispute
Maharashtra-Karnataka: महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळला

तसेच, सांगली जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या 60 फेऱ्यांपैकी 22 फेऱ्या आणि अन्य विभागांतील संवेदनशील मार्गावरील 48 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. गडिहग्लज, चंदगड, आजरा, तळकोकण व गोव्याला जाणाऱ्या बस फेऱ्या निपाणीऐवजी अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. सांगलीच्या जत जिल्ह्यातील 40 गावांनी कर्नाटक जाण्याचा ठराव केल्याने हा वाद निर्माण झाला. या गावांचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यासाठी सरकार गंभीर विचार करत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले होते. तसेच, विविध वादग्रस्त विधाने करून बोम्मई या वादाला खतपाणी घालत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com