Antilia Dainik Gomantak
महाराष्ट्र

Bomb Threat: अंबानी, बच्चन अन् धर्मेंद्र यांचे बंगले उडवण्याची धमकी; पोलिस प्रशासन सतर्क

बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या घरी आणि बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांच्या घरीही स्फोट होणार असल्याचे कॉलरने सांगितले आहे.

Manish Jadhav

Bomb Threat: नागपूर पोलीस कंट्रोलला फोनवर एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपतीसह, सिनेतारे हिटलिस्टवर असल्याची माहिती दिली आहे. सूत्रांनी सांगितले की, कॉलरने दावा केला की, उद्योजक मुकेश अंबानी यांचा बंगला अँटिलिया येथे स्फोट होईल.

याशिवाय, बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या घरी आणि बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांच्या घरीही स्फोट होणार असल्याचे कॉलरने सांगितले आहे. या फोननंतर नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली. मुंबई पोलिस कॉलरचा शोध घेत आहेत.

याआधीही, मुकेश अंबानींचे (Mukesh Ambani) घर अँटिलियाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ऑगस्ट 2022 मध्येही मुकेश अंबानी यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याचे कॉल आले होते.

एका धमकीने संपूर्ण देश ढवळून निघाला

तसेच, 25 फेब्रुवारी 2021 रोजी अशाच प्रकारच्या धमकीने देशभरात खळबळ उडाली होती. प्रत्यक्षात दुपारी अँटिलियाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना एक संशयास्पद स्कॉर्पिओ कार दिसली होती. ज्याची माहिती तात्काळ मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षाला आणि स्थानिक पोलिस ठाण्यात देण्यात आली होती.

यानंतर मुंबई पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. मुंबई पोलिसांचे श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथकाशिवाय एटीएसच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. गुन्हे शाखेचे अधिकारीही घटनास्थळी आले होते.

दुसरीकडे, बॉम्ब निकामी पथकाने गाडीची तपासणी सुरु केली होती. तपासादरम्यान, गाडीच्या आतून जिलेटिनच्या अनेक कांड्या सापडल्या होत्या. तसेच एसयूव्हीमध्ये काही नंबर प्लेट्सही सापडल्या होत्या.

पोलिसांसाठी आश्चर्याची आणि अडचणीची बाब म्हणजे कारमध्ये सापडलेल्या काही नंबर प्लेट्स उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटशी जुळत होत्या.

त्याचबरोबर, या घटनेने मुंबई पोलिसांचे धाबे दणाणले होते. स्कॉर्पिओच्या ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी असलेल्या सीटवर आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचे ब्रँडिंग असलेली बॅगही होती. पोलिसांनी या कटामागील दहशतवादी कनेक्शनचाही तपास सुरु केला होता. श्वान पथकाने घटनास्थळी शोध घेतला. पुरावे आणि सुगावा शोधला जात होता.

अँटिलिया स्फोटावर बनणार वेब सिरीज

या प्रकरणाचा तपास बराच काळ चालला आणि हे प्रकरण खूप गाजले. दोन वर्षांपूर्वी अँटिलियाच्या बाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारच्या मुद्द्यावर एक सनसनाटी आणि रोमांचक वेब सिरीज बनवली जाणार असल्याची बातमीही अलीकडेच आली होती. अनेक निर्माते या कथेत रस दाखवत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT