India-US Trade Deal: कृषी, डेअरी अन् मॅन्युफॅक्चरिंगसाठी भारताचा 'मास्टरस्ट्रोक', पीयूष गोयल यांनी लोकसभेत 'ट्रेड डील'विषयी स्पष्टच सांगितलं; जाणून घ्या 10 पॉइंट्स

Piyush Goyal On India-US Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापार कराराचा महत्त्वपूर्ण तपशील केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी (4 फेब्रुवारी) लोकसभेत सादर केला.
Piyush Goyal On India-US Trade Deal
Piyush Goyal Dainik Gomantak
Published on
Updated on

India-US Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापार कराराचा महत्त्वपूर्ण तपशील केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी (4 फेब्रुवारी) लोकसभेत सादर केला. या करारामुळे जागतिक बाजारपेठेत भारताची ताकद वाढणार असून, देशातील महत्त्वाच्या क्षेत्रांना संरक्षण देण्यावर भर देण्यात आला. या संदर्भात गोयल यांनी माहिती दिली की, अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेमध्ये भारतीय शिष्टमंडळाने अत्यंत चणाक्षपणे आपली बाजू मांडली. विशेषतः शेती आणि दुग्धव्यवसाय यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांना या करारामुळे कोणताही धोका पोहोचणार नाही, याची खात्री करण्यात आली.

हा करार केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून, भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या आर्थिक हितासाठी तो अत्यंत फायदेशीर ठरेल. गेल्या वर्षभरापासून दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये सातत्याने चर्चा सुरु होती, ज्याचे फळ आता या द्विपक्षीय व्यापार कराराच्या रुपाने समोर आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरला. 2 फेब्रुवारी 2026 रोजी उभय नेत्यांमध्ये झालेल्या दूरध्वनी चर्चेनंतर अमेरिकेने भारतीय निर्यातीवरील टॅरिफ कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे भारतीय वस्तूंना अमेरिकन बाजारपेठेत अधिक संधी मिळणार आहेत.

Piyush Goyal On India-US Trade Deal
Narendra Modi Resolutions: PM मोदींचा गोवा दौरा आणि त्यांचे 9 संकल्प तडीस नेण्याचे आव्हान

भारताने (India) गेल्या सहा वर्षांत आपल्या व्यापारी धोरणांमध्ये मोठे बदल केले असून, या कालावधीत झालेला हा नववा यशस्वी करार आहे. यापूर्वी भारताने युरोपियन युनियन, ओमान, न्यूझीलंड आणि यूके यांसारख्या मोठ्या देशांशी व्यापारी करार केले आहेत. अमेरिकेसोबतचा हा करार या वर्षातील दुसरी सर्वात मोठी उपलब्धी मानली जात आहे. या करारामुळे भारतीय निर्यातदारांना, विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना जागतिक स्तरावर मोठी स्पर्धात्मक आघाडी मिळणार आहे. कराराच्या अधिकृत घोषणा पूर्ण झाल्यानंतर लवकरच यातील तांत्रिक आणि सविस्तर माहिती सार्वजनिक केली जाईल.

Piyush Goyal On India-US Trade Deal
PM Modi Goa Visit: 'श्रीकृष्ण जसे विचार करत होते, तसे PM मोदीही सर्वसमावेशक विचार करतात'; विद्याधीश स्वामींचे गौरवोदगार

भारत-अमेरिका व्यापार करारातील 10 महत्त्वाचे मुद्दे

  • ही मेगा ट्रेड डील भारत आणि अमेरिका (America) या दोन्ही देशांच्या परस्पर आर्थिक हितासाठी फायदेशीर ठरणार आहे.

  • या करारामध्ये कृषी क्षेत्रातील हितसंबंधांना पूर्ण संरक्षण दिले असून, शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही.

  • चर्चेदरम्यान भारतीय प्रतिनिधींनी शेती आणि दुग्धव्यवसाय यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांच्या हिताचे यशस्वी संरक्षण केले.

  • दोन्ही देशांमध्ये तब्बल एक वर्ष चाललेल्या सविस्तर वाटाघाटींनंतर या द्विपक्षीय करारावर शिक्कामोर्तब झाले आहे.

  • 2 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर खल झाला.

  • मोदींशी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतीय निर्यातीवरील टॅरिफ (शुल्क) 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली.

  • इतर प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत अमेरिका भारताकडून आकारत असलेले उच्च टॅरिफ आता कमी होणार आहेत.

  • या करारामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय मालाची निर्यात करण्याची स्पर्धात्मक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

  • श्रमप्रधान क्षेत्रे आणि उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील भारतीय निर्यातदारांना या डीलमुळे विशेष फायदा मिळणार आहे.

  • कराराची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा अधिक सविस्तर तपशील अधिकृतपणे जाहीर केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com