Reliance Lotus Chocolate Stocks: 'या' कंपनीचे बल्ले-बल्ले, मुकेश अंबानी खरेदी करणार हिस्सेदारी!

Lotus Chocolate Stocks: भारताचे दिग्गज अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे कोणत्याही क्षेत्राचा नकाशा बदलण्याची क्षमता आहे.
Mukesh Ambani
Mukesh AmbaniDainik Gomantak

Reliance Retail To Buy Majority Stake In Lotus Chocolate: भारताचे दिग्गज अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे कोणत्याही क्षेत्राचा नकाशा बदलण्याची क्षमता आहे. टेलिकॉम क्षेत्रातील जिओचे यश कोणापासून लपलेले नाही. अंबानींच्या रिलायन्सने एखाद्या कंपनीतील भागभांडवल खरेदीची घोषणा केली, तर त्याचे मूल्य आपोआप वाढते. चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीचे नशीबही लवकरच पालटणार आहे. या चॉकलेट कंपनीत रिलायन्स रिटेल 51 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. ही बातमी समोर येताच चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली.

अप्पर सर्किट मिळाले

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात काम सुरु होताच, लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडच्या शेअर्सने अप्पर सर्किट गाठले. यामध्ये शेअरने 5 टक्क्यांपर्यंत (5.85 रुपये) झेप घेतली आणि तो 122.95 रुपयांवर पोहोचला. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, रिलायन्स (Reliance) रिटेलने चॉकलेट कंपनीतील बहुतांश भागभांडवल खरेदी केल्याची बातमी गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचताच त्यांनी घाईघाईने शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली.

Mukesh Ambani
Reliance vs Adani Group: अदानी ग्रुपला लवकरच मागे टाकणार मुकेश अंबानींची रिलायन्स

तसेच, रिलायन्स रिटेलची प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानी आहे. याशिवाय मुकेश अंबानी रिटेल क्षेत्रातही विस्तार करत आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स रिटेल लोटस चॉकलेट कंपनीतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्यास तयार आहे. यासाठी प्रति शेअर किंमत 113 रुपये निश्चित करण्यात आली आहे. लोटस कंपनी 1988 मध्ये सुरु झाली.

Mukesh Ambani
Reliance Jio Laptop : आता फक्त 15 हजारात मिळणार Jioचा 4G लॅपटॉप

सौदा कितीत होणार?

रिलायन्स रिटेल आणि लोटस कंपनी यांच्यातील हा करार सुमारे $8.94 दशलक्षचा असेल. रिलायन्स रिटेलने या चॉकलेट कंपनीतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याची योजना आखली आहे. याशिवाय, ओपन ऑफरद्वारे अतिरिक्त 26 टक्के हिस्सा खरेदी केला जाईल. सध्या प्रवर्तक गट आणि कंपनीमध्ये प्रवर्तकांची भागीदारी 72 टक्के आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com