Goa News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Goa News: नीरस सोहळ्याने मराठी साहित्य संमेलनाची सांगता

Goa News: मंत्र्यांच्या सोयीसाठी घाई अन् आशयरहित भाषणे : महनीय पाहुणे अनुपस्थित

दैनिक गोमन्तक

महिमा ठोंबरे

Goa News: पूज्य साने गुरुजी साहित्यनगरी, अमळनेर, ता. 4 : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांची अनुपस्थिती, त्याऐवजी आलेल्या मंत्र्यांनी घाईघाईत भाषणे करीत घेतलेला काढता पाय, मंत्र्यांच्या प्रस्थानानंतर मोकळे झालेले प्रेक्षागृह आणि आशयरहित भाषणे, अशा नीरस सोहळ्याने 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची रविवारी (ता. 4) सांगता झाली.

मंत्र्यांच्या सोयीसाठी घाईघाईत उरकलेल्या या समारोप सोहळ्याने या तीनदिवसीय संमेलनाचे सूप वाजले. समारोप सोहळ्याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याचे मराठी भाषा व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मदत व पुनर्वसनमंत्री आणि संमेलनाचे निमंत्रक अनिल पाटील, पाणीपुरवठामंत्री आणि संमेलनाचे संरक्षक गुलाबराव पाटील,

खासदार उन्मेष पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी आदी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, ‘‘मराठीत खूप संमेलने होतात; पण त्या सर्व संमेलनांना एका व्यासपीठावर आणण्याची गरज आहे. नाट्य, चित्रपट अशा ज्या-ज्या माध्यमातून मराठी भाषा जगभर पोहोचते, त्या-त्या सर्वांना एकत्र आणणारा मंच तयार व्हावा, यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोलणार आहे.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: क्रूझ पर्यटन हंगामाला सुरुवात, पहिले जहाज दाखल; 2 हजार पर्यटकांनी घेतले गोवा दर्शन

Goa Agriculture: कृषी लागवडीत 1.927 हेक्‍टरने घट! भात लागवडीचे 10,207 हेक्‍टर क्षेत्र घटले; 11 वर्षांचा तपशील

Tiger Reserve Goa: दोन टप्प्यांत व्याघ्र प्रकल्प साकारा! पाहणीअंती सक्षम समितीची शिफारस; 15 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

Horoscope: प्रयत्नांना अपेक्षित दिशा मिळेल, नोकरी किंवा व्यवसायात लाभ; 'या' राशीच्या लोकांनी लक्षात ठेवा आजचा दिवस तुमच्या बाजूने वाहतोय

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT