Sanjay Raut

 
Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sanjay Raut: कायद्याला अतिशहाणपणा शिकऊ नये; राऊतांचा राणेंना टोला

'राणेंकडून महत्त्वाची माहिती लपवली जाऊ नये. महाराष्ट्र सरकार हे कायद्याप्रमाणे काम करत आहे. कायदा आपलं काम करत असून त्याला कोणीही अतिशहाणपणा शिकऊ नये,' असा टोला संजय राऊत यांनी राणेंना लगावला.

दैनिक गोमन्तक

Sanjay Raut: महाराष्ट्रामध्ये आपल्या वक्तव्यामुळे अनेक राजकीय नेते नेहमी चर्चेत येत असतात. सिंधुदुर्गमधील राणे कुटुंब तर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या गुन्ह्यात भाजपा आमदार आणि नारायण राणे (Narayan Rane) यांचा मुलगा नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात काल केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली.

यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, 'एकंदरीत पाहताना लक्षात आलं की पोलिसांना हव्या असलेल्या संशयिताची माहिती त्यांना आहे. महत्त्वाची माहिती लपवली जाऊ नये. महाराष्ट्र सरकार हे कायद्याप्रमाणे काम करत आहे. कायदा आपलं काम करत असून त्याला कोणीही अतिशहाणपणा शिकऊ नये,' असा टोला त्यांनी राणेंना लगावला.

ते पुढे म्हणाले की, "पोलिसांना एखाद्याची माहिती हवी असल्यास ती न देणं हे चुकीचं. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं धोरण हे चुकीचं. नोटीस कुणाला पाठवायचं हे कायदा विभागाचं काम आहे."

या प्रकरणा संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. याबाबत पत्रकारांनी त्यांना नितेश राणे कुठे आहेत असे विचारले असते, 'नितेश कुठे आहे हे सांगायला मी काय मूर्ख आहे का?' असे उत्तर दिले. त्यावरुनच आता कणकवली पोलिसांनी नोटीस पाठवून नारायण राणे यांनी नितेश राणे यांची माहिती द्यावी असं म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT