cyber attack Dainik Gomantak
महाराष्ट्र

'भारत सरकारने मुस्लिमांची माफी मागावी',ठाणे शहर पोलिसांची अधिकृत वेबसाइट हॅक करून दिला संदेश

महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांच्या वेबसाइटवर सायबर हल्ला

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांच्या वेबसाइटवर सायबर (Thane Police website hacked) हल्ला झाला असून ही वेबसाइट काही अज्ञातांकडून हॅक करण्यात आली आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहरातील पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आल्याची माहिती काही ठाणे पोलिसांनीच दिली.(Prophet Muhammad row)

मिळालेल्या माहितीनुसार, वेबसाइट सुरू होताच ‘हॅक्ड बाय वन हॅट सायबर टीम’ असा SMS दिसत आहे. वेबसाईट हॅक करणाऱ्या हॅकरने, ‘भारत सरकार, तुम्ही इस्लामच्या संदर्भात वारंवार अडथळे निर्माण करता, तुम्हाला सहिष्णुता दिसत नाही, लवकरात लवकर जगातील मुस्लिमांची माफी मागा, अन्यथा आम्ही शांत राहणार नाही,' असा संदेश हॅकर्सने वेबसाईटवर दिला आहे.

मागील काही वर्षांपासून सायबर अटॅक मोठ्या प्रमाणात होत आहे. वेबसाइट हॅक करण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून ते अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या, सेलिब्रिटिंच्या आणि संस्थांच्या वेबसाइट हॅक करण्यात आल्या आहेत. अशातच आज ठाणे पोलिसांचीही वेबसाइट हॅक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वेबसाइट हॅक झाल्याच्या वृत्ताला ठाणे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: '32 तासांत एकाचा जीव जातोय, गुन्ह्यांची आकडेवारी भयानक पण शिक्षेचे प्रमाण कमी'; विधानसभेत सरदेसाईंचा हल्लाबोल

Goa Crime: 2 वर्षांत 256 देशी-विदेशी पर्यटकांबाबत गुन्‍ह्यांच्‍या घटना! मुख्‍यमंत्र्यांची माहिती; सर्वाधिक प्रकरणे चोरीची

Goa Vegetable Import: शेतीमालासाठी गोवा कर्नाटक, महाराष्‍ट्रावर अवलंबून! 20639 मेट्रिक टनची तफावत; कांदाबटाट्याची वाढली आयात

Liquor Seized: गोव्यात चेकनाक्‍यांवर 3.14 कोटींची दारू जप्‍त! मागच्या वर्षी मोठी कारवाई; मुख्‍यमंत्र्यांची माहिती

Goa POGO Bill: 20 डिसेंबर 1961 पूर्वी जे गोव्यात होते तेच खरे गोमंतकीय, 'त्यांचे' हित जोपासणार तरी कधी?

SCROLL FOR NEXT