Sushant Singh Rajput Death Case: Musa Drug Peddlar name comes up in Investigation Dainik Gomantak
महाराष्ट्र

बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवणारा 'मूसा' NCB च्या रडारवर

दैनिक गोमन्तक

मुंबईचा (Mumbai) सर्वात मोठा ड्रग माफिया मूसा (Musa) आजकाल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) रडारवर आहे. मुसा एक आफ्रिकन नागरिक आहे, ज्याचे तार जगातील सर्वात क्रूर कोलंबियन कार्टेलशी (Colombian cartel) जुळले असल्याचे म्हटले जाते. बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवण्यामागे देखील मुसाचे नेटवर्क असल्याचे पुरावे तपासात मिळाले आहेत. सुत्रानुसार मुसा त्याच्या ड्रग्ज सप्लायरमधून दररोज सुमारे 2 कोटी रुपये कमवतो. तो मुंबईचा सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर आहे असे मानले जाते आणि त्याचे संबंध अनेक मोठ्या लोकांशी असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने गेल्या आठवड्यात मुसाला अटक करण्यासाठी छापा टाकला होता पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूसाकडे एक सुरक्षा दल आहे. त्याच्यासोबत तोफा आणि तलवारी घेवून असलेले अंगरक्षक आहेत. मूसा आपला सगळा काळा बाजार मानखुर्द आणि वाशी दरम्यानच्या जंगल भागातून (forest of Vashi) चालवतो. मुसा आणि त्याच्या लोकांना या भागाची पूर्ण माहिती आहे. मात्र जंगलाच्या सभोवतालच्या दलदलीमुळे पोलीस आणि इतर यंत्रणांना या ठिकाणी पोहचणे अशक्य आहे.

मूसाची पर्सनल बॉडीगार्ड ताब्यात

गेल्या आठवड्यात NCB ने केलेल्या छाप्यात, मूसा पळून गेला पण त्याचा पर्सनल बॉडीगार्ड ओबिओरा एकवेलरला अटक करण्यात आली. या छाप्यादरम्यान मुसाच्या लोकांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर गोळीबार केला होता, ज्यात अनेक लोक जखमी झाले होते. मूसा मुंबईत कोकेन, हेरोइन आणि एमडीचा सर्वात मोठा सप्लायर आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ड्रग्ज रॅकेट प्रकरणाच्या तपासात त्याचे नावही पुढे आले आहे. असे मानले जाते की मुंबईच्या पॉश पार्ट्यांमध्ये त्याचेच ड्रग्ज पुरवले जाते.

मूसा कधीच आपला अड्डा सोडून बाहेर जात नाही

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसा कधीही त्याचा अड्डा सोडून बाहेर जात नाही म्हणजेच जंगलाबाहेर जात नाही. मुंबईचे सर्व ड्रग विक्रेते येथे येतात आणि ड्रग्ज खरेदी करतात. या भागात त्याची सुरक्षा टीम प्रत्येक व्यक्तीवर बारीक नजर ठेवून असते. त्याच्या अडड्यावर प्रवेश करण्यापूर्वी, मूसाचे अंगरक्षक येणाऱ्यांची कसून चौकशी करते. नंतर त्याचा फोटो काढते. आणि त्यानंतर पूर्ण शाश्वतीनंतर बाहेरच्या व्यक्तीची मुसाशी भेट होते. मूसा चा कोलंबियन ड्रग्ज कार्टेलशी संबंध आहेत आणि तो मुंबईत कार्टेलचेच काम सांभाळतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT