Expressway Dainik Gomantak
महाराष्ट्र

अपघातांना ब्रेक लावण्यासाठी; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 'रबर स्ट्रीप'

एक्स्प्रेस वेवरील अपघातांचे हॉट स्पॉट असलेल्या सात ठिकाणी रंबळ स्ट्रीप टाकण्यास सुरुवात केली.

दैनिक गोमन्तक

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरती (Mumbai Pune Expressway) ताशी 80 किलोमीटरची वेगमर्यादा आहे. मात्र वाहन चालक सरकारकडून जाहीर केलेली नियमावली पायदळी तुडवत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले. विशेष म्हणजे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गाडी पळवणाऱ्या चालकांना पोलिसांनी (Police) अनेकदा दंडीत केले आहे. तसेच अति स्पीडमुळे अपघाताचे प्रमाण देखील अधिक आहेत. (Speed ​​breakers are being installed on Mumbai Pune Expressway)

त्यामुळे प्रशासनाने एक्स्प्रेस वेवरील अपघातांचे हॉट स्पॉट असलेल्या सात ठिकाणी रबर स्ट्रीप टाकण्यास सुरुवात केली. हे केल्याने वाहने वेगाने चालवणाऱ्या अनेकांना गाड्यांचे स्पिड स्लो करावे लागणार आहे. अमृतांजन ब्रिज, आडोशी बोगदा, खोपोली बायपास या ठिकाणी हे स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहेत, अफकॉन कंपनीसमोर उतारावरही रबर स्ट्रीप (Rubber Strip) बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गाडी स्पीडने दामटवत असल्याने अपघातामध्ये वाढ झाली

मुंबई-पुणे जुना महामार्ग अरुंद व नागमोडी वळणांचा असल्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी अधिक वेळ लागत होता,,, तसेच वाहतुकीची अधिक कोंडी देखील होत असे. त्यामुळे जलद गतीने प्रवास होण्यासाठी द्रुतगती महामार्ग उभारण्यात आला आहे. यामुळे पनवेलहून निघालेले वाहन तास दीड तासातच पुण्यामध्ये दाखल होते. विशेष म्हणजे पूर्वी बोर घाटात वाहतुकीचा विचका पाहायला मिळायचा. मात्र वाढलेली वाहनांची संख्या जास्त होती आणि सहा पदरी रस्त्यांमुळे चालक आपल्या गाड्या ताशी 120 ते 130 पर्यंत दामटवत असल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येचा आलेख चढताच आहे.

या सात हॉट स्पॉटवर रंबळ स्ट्रीप

कॅमेरे बसवतानाच स्पीडगन वाहने तैनात करण्यात आली. परंतु, त्यानंतरही अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाहीये. सतत अपघाताच्या घटना घडत असल्याने अफकॉन कंपनीने सात ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यास सुरुवात केली. अमृतांजन ब्रिज, आडोशी बोगदा, खोपोली बायपास व अंडा पॉइंट अशा चार ठिकाणी यापूर्वीच रंबळ स्ट्रीप बसवण्यात आले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सध्या दोन ठिकाणी काम चालूच आहे. त्यामुळे रोज तीनवेळा पंधरा मिनिटांचा ब्लॉक घ्यावा लागत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT