हिंदू मुलींचं धर्मांतर (encouraging and supporting Conversion of Hindu girls) करण्यासाठी महाराष्ट्रातील काही विवाहसंस्था प्रोत्साहन आणि समर्थन देत आहेत. असा आरोप भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. नितेश राणे यासंधर्भात एक ट्वीट केले आहे. पावसाळी अधिवेशनात देखील राणे यांनी हिंदू तरुणींच्या धर्मांतराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांना आता नवीन आरोप केल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील काही विवाहसंस्था हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहन व समर्थन देत आहेत. फक्त दोन हजार रुपयांत या विवाहसंस्था खोटं विवाह प्रमाणपत्रं देत आहेत. अशा विवाहसंस्था बंद करुन, दोषींना अटक केली पाहिजे. असं ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील नितेश राणे यांनी हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिलं जात आहे. त्यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आलं असल्याचा आरोप केला होता. अहमदनरमध्ये अल्पवयीन मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडत, अत्याचार करण्यात आल्यानंतर त्यांनी हे आरोप केले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.