Basilica of Bom Jesus
Basilica of Bom JesusDainik Gomntak

बॅसिलिका ऑफ बॉम जिझस महिनाभरासाठी राहणार बंद

बॅसिलिका ऑफ बॉम जीझस 5 सप्टेंबरपासून पर्यटकांना प्रवेश नाही
Published on

Basilica of Bom Jesus: ओल्ड गोवा येथील बॅसिलिका ऑफ बॉम जीझस ही वास्तू आता 5 सप्टेंबरपासून महिनाभर बंद राहणार आहे. जागतिक वारसा स्थळाच्या शाश्वत संवर्धनासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI), शाखा मुंबई पुरातत्व सर्वेक्षण विभागाअंतर्गत यावास्तू साठीच्या दुरुस्थीतीचे काम सूरु होणार आहे.

Basilica of Bom Jesus
Goa Education|‘नवीन शैक्षणिक धोरणा’साठी 15 सदस्यीय सल्लागार समिती

5 सप्टेंबरपासून संपूर्ण बॅसिलिका सार्वजनिकरित्या नागरिक, देश विदेशातून येणारे पर्यटक यांना पाहण्यासाठी बंद असणार आहे. यांच्या प्रवेशाशिवाय हे कामकाज सुरु असणार आहे. अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाअंतर्गत देण्यात आली आहे.

Basilica of Bom Jesus
CM Pramod Sawant|...बोला ‘प्रमोद’जी बोला!
Basilica of Bom Jesus
Basilica of Bom JesusDainik Gomntak

बॅसिलिकाचे मुख्याअधिकारी पॅट्रिसिओ फर्नांडिस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मी खूप दिवसांपासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला हे काम करण्याची विनंती करत होतो. अखेर एएसआय मुंबईने ते आपल्या हातात घेतले आहे. आणि 5 सप्टेंबरपासून ते काम सुरू करणार आहे. या कालावधीत ही संपुर्ण वास्तू झाकली जाईल ते असे ही ते पुढे म्हणाले.

जलसंपदा विभाग ही (WRD) बॅसिलिकाच्या पुढील खालचा भाग कामकाजासाठी बंद करणार आहे. कारण गतवर्षी पावसाळ्यात हा परिसर जलमय होऊन दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांची यावेळी गैरसोय झाली होती. त्यामूळे तो ही प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

"बॅसिलिका ऑफ बॉम जीझस, ड्रेनेजच्या कामामुळे आम्ही लोकांना बॅसिलिका पाहण्यासाठी, विशेषतः पर्यटक आणि यात्रेकरूंचे मनोरंजन करू शकणार नाही. लोक येत आहेत. मात्र त्यांची काहीशी गैरसोय होते आहे. मात्र आपल्याला शाश्वत संवर्धनासाठी दुरुस्थी करावीच लागेल असे ही बॅसिलिकाचे मुख्याअधिकारी पॅट्रिसिओ फर्नांडिस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com