Silver Pomfret Maharashtra State Fish: Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra State Fish: पापलेट बनला महाराष्ट्राचा राज्य मासा; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा...

अनेक मच्छिमार संघटनांनी केली होती मागणी

Akshay Nirmale

Silver Pomfret Maharashtra State Fish: खोल समुद्रात मिळणारा रुपेरी पापलेट आता महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून ओळखला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने पापलेटला (Silver Pomfrets) राज्य माशाचा दर्जा दिला आहे.

मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईतील मत्स्यपालन, पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत ही घोषणा केली.

दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांपासून पापलेट माशाला राज्य मासा म्हणून अधिकृत दर्जा मिळावा यासाठी मागणी केली जात होती. पापलेट प्रजातीचे जतन करण्याच्या दृष्टीने अनेक मच्छिमार संघटनांनी तशी मागणी केली होती. राज्य सरकारने पापलेटचे महत्त्व जाणून टपाल तिकिटही जारी केले आहे.

महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर हर्णे ते पालघर दरम्यान हा मासा मोठ्या प्रमाणात सापडतो. हा मासा काहीसा सफेद किंवा सिल्वर दिसतो. पापलेटला बाजारात मोठी मागणी असून त्यातून मोठी आर्थिक उलाढाल मोठी होते. चवीला उत्तम असलेल्या पापलेटची निर्यात देखील मोठ्या प्रमाणात होते.

पापलेटला सरंगा म्हणूनही ओळखतात. राज्यातून सर्वाधिक निर्यात या माशाची होते. मात्र, 1980 पासून त्याचे उत्पादन घटत चालले आहे. हा मासा दुर्मिळ होत चालला आहे. पालघरमधील सातपाटी येथील समुद्रात मिळणाऱ्या माशाला एक विशिष्ट चव आहे, त्यामुळे तेथील पापलेटला मोठी मागणी आहे.

महाराष्ट्राची राज्य प्रतिके

  • राज्य प्राणी- शेकरु

  • राज्य पक्षी- हरियाल

  • राज्य फूल - ताम्हण किंवा जारूल

  • राज्य फळ- आंबा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT