Panaji News: ‘अष्टमी फेरी’साठी सलग दुसऱ्या दिवशी व्यावसायिकांची गर्दी; पोलिस बंदोबस्तात घेतले अर्ज

एकरकमी भाडे आकारल्याने अनेकांचा हिरमोड
Panaji Ashtmi Feri News
Panaji Ashtmi Feri NewsDainik Gomantak

Panaji Ashtmi Feri News: गोव्याची राजधानी पणजीतील अष्टमीच्या फेरीसाठी मंगळवारी सायंकाळपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. व्यावसायिकांकडून 2 बाय 4 आकाराच्या दुकानासाठी 12 दिवसांचे एकरकमी 26 हजार 400 आणि अर्जाचे 500 रुपये असा दर निश्‍चित करण्यात आला होता.

एवढी मोठी रक्कम एकदम भरायची असल्याने सकाळी ज्यांनी गर्दी केली होती, त्यातील अनेकजणांनी तेथून काढता पाय घेतला. तर काहीजण सायंकाळपर्यंत भाडे भरण्याची रक्कम कमी होईल, अशी अशा धरून महानगरपालिकेच्या आवारात उभे होते.

Panaji Ashtmi Feri News
Goa Mining: खाणीच्या लिलावाबाबत आता केंद्राचे कडक नियम; 45 दिवसात माहिती द्यावीच लागणार...

सोमवारी व्यावसायिकांनी अष्टमीच्या फेरीचे अर्ज महानगरपालिका देणार म्हणून सकाळपासून रांगा लावल्या होत्या. परंतु काही तासांनी महापौरांनी अर्जांची विक्री मंगळवारी म्हणजे आज करण्याची घोषणा केली.

त्यानुसार आज सकाळी साडेदहा नंतर अर्ज स्वीकारण्याच्या कामास महानगरपालिकेचे आयुक्त ग्लेन मेदेरा यांच्या मार्गदर्शनाखाली करअधिकारी सिद्धेश नाईक व इतर कर्मचाऱ्यांनी सुरवात केली.

तत्पूर्वी रांगा लावून गर्दी केलेल्या परप्रांतीय व्यावसायिकांना ज्यांची एकरकमी रक्कम भरण्याची तयारी आहे, त्यांना क्रमांकाचे कुपन देण्यात आले होते. त्या कुपननुसार अर्ज स्वीकारण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.

Panaji Ashtmi Feri News
Goa Accident Cases: आता अपघातग्रस्तांना मिळणार वेळेत उपचार! आरोग्य विभागातर्फे खास 2 रुग्णवाहिका तैनात

400 दुकानांचे नियोजन

मिळालेल्या माहितीनुसार, अष्टमीच्या फेरीमध्ये 400 दुकानांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील काही दुकानांचा आकार 2 बाय 4, 4 बाय 4 आणि त्यापुढे मोठ्या आकाराची शंभर दुकाने फर्निचरवाल्यांसाठी असणार आहेत.

बारा दिवस ही फेरी राहणार असल्याने महानगरपालिकेने यंदा एकरकमी सर्व पैसे जमा करून घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार 2 बाय 4 आकाराच्या दुकानासाठी व्यावसायिकाला 26 हजार 400 आणि अर्जाचे 500 रुपये भरून घेतले जात होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com