boris johnson Dainik gomantk
महाराष्ट्र

धार्मिक दंगलींच्या ‘ब्रॅण्डिंग’साठी ब्रिटीश पंतप्रधान ‘जेसीबी’वर; शिवसेनेचा निशाणा

सामनातून केंद्र सरकारला फटकारले

दैनिक गोमन्तक

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. गेले तीन दिवस त्यांनी भारतातील अनेक ठिकाणांना भेट दिली आहे. सुरुवातीला त्यांनी गुजरात येथील साबरमती आश्रमास भेट देत जगाला आहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींच्या भुमीत आल्याने आपण धन्य झाल्याचं ही ते म्हणाले होते. यानंतर त्यांनी गुजरातमधील जेसीबी कारखान्याला भेट दिली. यावेळी त्यांनी वाहनासहीत फोटो काढला यावरुन भारतातील धार्मिक दंगलींचे ‘ब्रॅण्डिंग’ करण्यासाठी ब्रिटीश पंतप्रधान ‘जेसीबी’वर असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. (shivsena slams bjp over British PM visit to india)

सामनातून निशाणा साधत जहांगीरपुरामध्ये जेसीबीच्या कारवाईवरुन वाद निर्माण झालेला असताना ब्रिटीश पंतप्रधानांनी अशाप्रकारे या कारवाईचं प्रतीक असलेल्या वाहनासहीत फोटो काढून घेणं हे चुकीचं असल्याचं मत शिवसेनेनं व्यक्त केलंय. जॉन्सन यांच्या सल्लागार मंडळाला समजायला हवं होतं असं सांगतानाच शिवसेनेनं यावरुन अप्रत्यक्षपणे केंद्रात सत्तेमध्ये असणाऱ्या मोदी सरकारवर निशाणा साधला.

जहांगीरपुऱ्यातील जेसीबी कारवाई हे भाजपासाठी स्वाभिमानाचे प्रतीक बनले आहे. ही कारवाई फक्त मुस्लिम समुदायाला धडा शिकविण्यासाठी केली हा आक्षेप तितकासा खरा नसावा. कारण असंख्य हिंदूंच्या झोपड्या व व्यवसाय त्याच बुलडोझरने उद्ध्वस्त केले. म्हणजे फटका दोन्ही बाजूंना बसला,” असा उल्लेख ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये आहे. यावरुन जॉन्सन यांना जेसीबी फॅक्टरीत खास नेण्यात आले व उत्सव केला गेला. कारण त्याच वेळी देशभरातील विरोधी पक्ष दिल्लीतील ‘जेसीबी’ कारवाईविरुद्ध आवाज उठवीत होते, याचा काय अर्थ घ्यायचा?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.

“गांधींचा आयुष्यभर दुस्वास करणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिल्लीतील अत्याचाराचे ‘ब्रॅण्डिंग’ जागतिक पातळीवर केले हाच त्यामागचा अर्थ. जॉन्सन हे साबरमतीत होते त्या वेळी जहांगीरपुरा भागातील जेसीबी कारवाईत महात्मा गांधींच्या अनेक तसबिरी उद्ध्वस्त झाल्याची चित्रे प्रसिद्ध झाली आहेत. दुसरे असे की, भाजपातील अनेक महत्त्वाचे लोक गोडसे प्रकरणावर मूग गिळून बसतात. गोडसेंच्या उदात्तीकरणास ते पाठिंबा देतात, पण त्याच वेळी परदेशी पाहुण्यांना ओढत-खेचत गांधींच्या साबरमती आश्रमात नेतात व सूत कातायला लावतात, हे आश्चर्यच आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

Goa Drug Bust: कोलवाळ जेलजवळ गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 'इतक्या' लाखांच्या गांजासह राजस्थानच्या 19 वर्षीय तरुणाला अटक

Orry in Goa: चक्क बनियानवर 'ऑरी' गोव्यात! सोशल मीडियावर Video Viral; म्हणाला, 'माय काईंड ऑफ गोवा डे'

Goa Live News: पंतप्रधान मोदी काणकोण दौऱ्यावर! भव्य स्वागतासाठी गोवा सज्ज: मंत्री रमेश तवडकर

SCROLL FOR NEXT