लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळायला वेळ लागणार नाही; शरद पवार

सत्तेचा माज चढला की निर्बंध लादले जातात; दामोदर मावजो
95th All India Marathi Sahitya Sammelan begins in Latur
Sharad Pawar was present
95th All India Marathi Sahitya Sammelan begins in Latur Sharad Pawar was presentDainik Gomantak

लातूर : राज्यकर्त्यांनी साहित्य आणि माध्यमांची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसार माध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेतली जात आहे. चित्रपट क्षेत्रातही त्याचा मोठा शिरकाव झाला आहे. हाच भांडवलीकरणाचा प्रयोग आता साहित्य क्षेत्रात होत आहे. तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था भांडवलदारांनी ताब्यात घेतल्या आहेत. हे असेच सुरू राहिले तर लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

लातूरच्या उदगीर नगरीत आज 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शानदार सुरुवात झाली. छत्रपती शाहू महाराज सभागृहात डॉ. ना. य. डोळे व्यासपीठावर शरद पवार यांच्या हस्ते सकाळी साहित्य संमेलनाचे उदघाटन झाले. व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष, तथा ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, प्रमुख पाहुणे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार दामोदर मावजो, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उदघाटनापूर्वी सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती.

यावेळी शरद पवार म्हणाले, प्रपोगंडा साहित्य निर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण मिळत असून आपल्या देशात असाच विशिष्ट प्रपोगंडा पद्धतशीरपणे पसरवला जात आहे. साहित्यिक कोणत्याही विचारधारेला बांधील नसावेत. आपल्या देशात विशिष्ट विचारधारेचा प्रचार फैलावण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत आहे. याबद्दल जागरूक राहण्याची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

95th All India Marathi Sahitya Sammelan begins in Latur
Sharad Pawar was present
शाळांमध्ये आता क्वारंटाइन रूम अनिवार्य, दिल्ली सरकारचे नवे नियम

- सत्तेचा माज चढला की निर्बंध येतात : मावजो

प्रमुख पाहुणे तथा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार दामोदर मावजो यावेळी म्हणाले, सत्तेचा माज चढला की निर्बंध लादले जातात. आज साहित्यिकांमध्येही चिअर लीडर्स तयार झाले आहेत. ते सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीला प्रोत्साहन देतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपट आणि पुस्तकाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, “पुस्तकावरील बंदी रास्त होती का? काश्मीर फाईल्स चित्रपटात एकतर्फी चित्रण दाखवले, हे अर्धसत्य आहे असे काहींचे म्हणणे आहे. माझ्या एका मित्राचेही पुस्तक जाळण्यात आले. पण तुम्हाला एखादे पुस्तक पसंत नसेल म्हणून जाळणे, बंदी आणणे योग्य नाही. समर्पक उत्तर देण्यासाठी हवे तर दुसरी बाजू मांडणारे पुस्तक लिहावे.’

- अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवा

साहित्य प्रफुल्लित ठेवायचं असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे. पण जेव्हा सत्तेला माज चढतो, तेव्हा निर्बंध लादले जातात. एकाधिकारशाही बळकट करताना फॅसिझमला खतपाणी मिळते. अशावेळी साहित्यकार हात बांधून शांत बसू शकतात का?, अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.

- बंडखोर लेखक तयार व्हावेत

सत्तेपुढे नांगी टाकणारे आपल्याकडे खूपजण आहेत. त्यांची प्रतिभा कुठे गवत खाते माहिती नाही. साहित्यिकांमध्ये सत्तेत येतो, त्यांच्यासाठी चिअर करणारे चिअर लीडर्स तयार झालेत ही फार दुर्दैवी बाब आहे, अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. विद्रोही, बंडखोर लेखक तयार झाले पाहिजेत, असेही यावेळी ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com