Sanjay Raut  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Raut Writes to Mother: आई, मी नक्कीच परत येईन! संजय राऊत यांचे तुरूंगातून भावनिक पत्र

लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल; माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट लिहून घेतली गेली

गोमन्तक डिजिटल टीम

Raut Writes to Mother: पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता त्यांच्या आईला भावनिक पत्र लिहिले आहे. त्यातून त्यांनी आई, मी नक्की परत येईन, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

ईडी कोठडी संपली. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहीत आहे. 'ईडी'चे अधिकारी घरी आले तेव्हा तू बाळासाहेब ठाकरेंच्या फोटाखाली खंबीरपणे बसून होतीस. 'लवकर परत ये' म्हणालीस. आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागले. शिंदे नावाचा गट फुटून उद्धव ठाकरेंवर हल्ले करू लागला तेव्हा "काहीतरी करा, शिवसेना वाचवा!" असे सांगणारी तूच होतीस.

राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, तपास यंत्रणांच्या भीतीने अनेक आमदार, खासदारांनी शिवसेना सोडली. पण मी बेईमान नाही. कुणीतही खंबीरपणे उभे राहायला पाहिजे आणि मी ती हिंमत दाखवली. ती हिंमत बाळासाहेब ठाकरे आणि आई तुझ्यामुळेच मला मिळाली.

शिवसेना टिकवण्यासाठी लढावेच लागेल. मुल्यांसाठी लढताना हा संजय कमकुवत ठरला, तर काय तोंड दाखवणार? माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी 'गन पॉइंटवर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतली जात आहेत. उद्धव ठाकरे हे माझे जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?

नवी क्रांती घडेल

राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया व राहुल गांधींचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील व नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल... चिंता नसावी, मी येईनच. तोपर्यंत उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील. काळजी घे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: छोटीशी मेहनतच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल 'या' राशींसाठी हा आठवडा ठरणार खास; जाणून घ्या तुमचे भविष्य

Chimbel: '13 घरे नकाशातून केली गायब'! चिंबलवासीयांचा आरोप; 4.5 लाख चौमी जमीन हडप करण्‍याचा डाव असल्याचा दावा

Goa Assmbly Live: कदंब आणि कारमधील अपघातामुळे प्रवाशांना विलंब

Goa Politics: खरी कुजबुज; युरी, विजय गप्‍प बसणार?

Ukraine Attack: युक्रेनचा रशियाच्या तेल गोदामावर हल्ला! स्फोटानंतर भडकली आग; रशियाने डागली 7 क्षेपणास्त्रे, 76 ड्रोन

SCROLL FOR NEXT