Railways Notice To Hanuman: हनुमानजी 10 दिवसात मंदिर खाली करा!

रेल्वेची चक्क हनुमानालाच नोटीस; आदेश न मानल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
Railways Notice To Hanuman
Railways Notice To HanumanDainik Gomantak
Published on
Updated on

Railways Notice To Hanuman: अतिक्रमणविरोधी मोहिमेत स्थानिक प्रशासन बऱ्याचदा आधी नोटीस देत असते आणि नोटीस कालावधी संपल्यानंतर अतिक्रमणाच्या पाडकामाची कारवाई करत असते. अशाच एका कारवाईत रेल्वे प्रशासनाने चक्क भगवान हनुमानालाच नोटीस पाठविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Railways Notice To Hanuman
PM Modis Gifts E-Auction: पंतप्रधान मोदींना मिळालेल्या गिफ्ट्स खरेदी करण्याचा आज अखेरचा दिवस

विशेष म्हणजे, हनुमानाच्या मंदिरावर ही नोटीस चिकटवली आहे. १० दिवसात मंदिर सोडावे, आणि जमिन रिक्त करावी, असे आदेश या नोटीशीत दिले आहेत. शिवाय आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

झारखंडमधील धनबाद येथे हा प्रकार घडला आहे. धनबाद येथील बेकारबांध भागातील ही घटना आहे. येथील खाटिक वस्तीत रेल्वेच्या मालकीची जमिन आहे. या जमिनीवर अनेकांनी अवैधरित्या अनेकांनी कब्जा केलेला आहे. त्यामुळे रेल्वेने या जमिनीवरील झोपडपट्टीधारकांना नोटीस पाठली आहे. त्यासोबतच येथील हनुमान मंदिरालाही नोटीस पाठवली आहे.

नोटीशीत काय म्हटले आहे?

ईस्ट सेंट्रल रेल्वेने मंगळवारी संध्याकाळी ही नोटीस मंदिरावर लावली आहे. या नोटीशीवर हनुमानाचे नाव आहे. त्यात लिहिले आहे की, तुमचे मंदिर रेल्वेच्या जमिनीवर आहे. या जमिनीवर अवैध कब्जा केला गेलेला आहे. त्यामुळे नोटिस मिळाल्यानंतर 10 दिवसांत मंदिर हटवून घ्या आणि जमिन मोकळी करा. असे न केल्यास तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.

Railways Notice To Hanuman
Goa News: सात पर्यटकांना जीवनदान, तीन बेपत्ता मुलांना शोधण्यात जीवरक्षकांना यश

रेल्वेने मान्य केली चूक

धनबाद रेल्वे विभागाचे सिनियर सेक्श इंजिनियर एस. के. चौधरी म्हणाले की, ही व्यक्तीकडून झालेली चूक आहे. नोटीशीत चुकून हनुमानाचे नाव लिहिले गेले आहे, यात सुधारणा केली जाईल. यापुढे असे होऊ नये, याचीही काळजी घेतली जाईल. कुणाच्याही भावना दुखावण्याचा विभागाचा हेतू नव्हता. आम्हाला केवळ रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवायचे आहे.

20 वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य

बेकारबांध खाटिक मोहल्ल्यात 20 वर्षांपासून लोक रेल्वेच्या जमिनीवर अवैधरित्या झोपडपट्टीत राहत आहेत. येथील खाटिक समुदायाचे लोक उत्तर प्रदेशातून आलेले आहेत. रेल्वेने या सर्व घरांना अवैध ठरवत जमिन मोकळी करण्याची नोटीस दिली आहे. येथे 300 हून अधिक कुटूंबे वास्तव्यास आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com