Narayan Rane Vs Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

दसरा मेळाव्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं, Narayan Rane नी ठाकरे गटावर साधला निशाणा

Narayan Rane Vs Uddhav Thackeray: शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत बीएमसीने अद्याप ठाकरे आणि शिंदे गटाला परवानगी दिलेला नाही.

दैनिक गोमन्तक

Narayan Rane Vs Uddhav Thackeray: शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत बीएमसीने अद्याप ठाकरे आणि शिंदे गटाला परवानगी दिलेला नाही. दोन्ही बाजूंच्या अर्जावर बीएमसी संभ्रमात असून निर्णय घेण्यास असमर्थ असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेऊन दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे माजी नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. आम्ही आलो तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मैदानही मिळणार नाही, असे ते म्हणाले. खरी शिवसेना शिंदे यांची आहे. येत्या काळात त्यांना धनुष्यबाणही मिळणार आहे, असेही राणेंनी म्हटले.

दुसरीकडे, दसरा मेळाव्याचा दिवस जसजसा जवळ येत आहेत, तसतसा राज्यातील राजकारणाचा पार वाढू लागू लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सातत्याने सांगत आहेत की, दरवर्षीप्रमाणे शिवसेना (Shiv Sena) दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणार आहे. दुसरीकडे, बीएमसीला दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडूनही अर्ज आला आहे. शिंदे गट स्वतःला खरा शिवसैनिक सांगून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा दावा करत आहे. याप्रकरणी बीएमसीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमीला होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या आयोजनावरुन अजूनही संभ्रम कायम आहे. दोघांपैकी कोणीही मागे हटण्यास तयार नाही.

तसेच, उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर नेत्यांची बैठक बोलावल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. या भेटीत उद्धव यांनी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बैठकीत उद्धव यांनी नेत्यांना मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना बोलावून दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT