आज उच्च न्यायालयात माझ्या विरोधात शिवसेनेकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या त्यासंबंधी माझ्या बाजूने निकाल लागला आहे. 17 सप्टेंबरपर्यंत माझ्यावर खटला असल्याने मी त्यासंबधी काही बोलणार नाही. देश कायद्याने चालतो हे आत्ता सिध्द झाले आहे. माझ्या चांगुलपणाचा फायदा उचलला जातो याबद्दलही मी काही बोलणार नाही. आमची ही जनआशिर्वाद यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे, योजना यांची माहिती देण्यासाठी ही यात्रा होती. केंद्रामध्ये मला मंत्री म्हणून घेतले. सर्व मंत्र्यांना पंतप्रधानांनी सांगितले होते की, तुम्ही तुमच्या राज्यामध्ये जावा आणि कामाला सुरुवात करा. पंतप्रधांनांनी माझ्यावर विश्वास दाखवला यासंबंधी मी त्यांचा ऋणी आहे. विरोधकांनी माझ्याविरोधात षडयंत्र चालवले, मात्र माझा पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला. मी असं काय बोललो होतो, मात्र त्या वक्तव्यासंबंधी आता मी काही बोलणार नाही. राजकारणात मला 52 वर्षे झाली. काय शिवसेनेच्या नेत्यांनी असे काही शब्द वापरले नाहीत. त्यांना हे काही माहिती नाही.
परवापासून मी जन आशीर्वाद यात्रा सुरु करणार आहे. योगींच्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान केले हे त्यांना पटतं का. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यबाबतीत मुख्यमंत्र्यांनी निर्लज्ज असा शब्द वापरला होता. राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवल्यामुळे मी बोललो होतो. तुम्ही माझं काही करु शकत नाही. शिवसेना वाढली तेव्हा आत्ताचे कोणीही नव्हते. अधिकाऱ्यांना मला पकडण्यासाठी आदेश दिले होते. राज्यात महिला, मुली सुरक्षित नाहीत. पूजा चव्हाणला अजून न्याय मिळाला नाही.
आम्ही कायदेशीर लढाई लढणार, त्यामध्ये कोणी असेल त्यांना तुरुंगात पाठविल्याशिवाय गप्प बसणार नाही. कोरोना काळात 1 लाख 57 हजार लोकांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांचे प्रश्न, गोरगरिबांचा प्रश्न यासंबंधी आम्ही बोलायचं नाही का. लोकांची बाजू घेणे हे आपले कर्तव्य आहे. आज न्यायालयात सुनावणी होती. ऑर्डरमध्ये राज्य सरकारला माझ्यावर कोणतेही बंधने लावण्यात येऊ नये असा उल्लेख करण्यात आला आहे. 17 सप्टेंबर पर्यत मी या केसच्या संबंधी काही बोलणार नाही.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) आणि शिवसेना यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. काही दिवसांपूर्वी महाडध्ये नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसेना आणि राणे समर्थक यांच्यात निर्माण झालेली रस्त्यावरील लढाई अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंबंधी महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक शहरांमध्ये खटला दाखल करण्यात आला.
काल रात्री उशिरा नारायण राणे यांच्यावर दाखल केलेल्या खटल्याच्या विरोधात न्यायालयाने सुनवाणी झाली. आणि अखेर त्यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात वादंगाचे सत्रच सुरु झाले. आता भाजपने शिवसेनेवर पलटवार करत दसरा मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यासंबंधी तक्रार दाखल करण्याचा विचार सुरु केला आहे. त्यामुळे आता पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे काय बोलतील याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील राजकिय नाट्याला आता पुन्हा एकदा वेग येऊ लागला आहे. एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आता भाजपने पलटवार म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात यवतमाळमध्ये तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळावा दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याविरोधात टिका करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे योगींवर विरोधात केलेल्या विधानावरुन ही तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 'योगी असेल तर तो मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो, त्याने गुहेत जाऊन बसले पाहिजे' असं वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते.
राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद चिघळला
नारायण राणे यांचा राजीनामा घेऊन त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्यात यावे. अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केले आहे. शिवसैनिकांशी लढण्याची भाषा नारायण राणे आणि त्यांच्या चंगू-मंगूने करु नये. नारायण राणेंचा संयम सुटलेला आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यलयावर दगड फेक करत तोडफोड केली आहे. तर जूहूमध्ये देखील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदेलन केले. कानफाटात मारण्याची भाषा ही ठाकरी भाषा नाही. असे मुंबई महानगरपालीकेचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हणले आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे आता याचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. सांगलीत देखील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पोस्टरला काळे फसले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.