Vaibhav Naik Dainik Gomantak
महाराष्ट्र

शिवरायांच्या पुतळ्यावरुन सिंधुदुर्गात राजकारण तापलं, वैभव नाईकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय फोडलं Video

Vaibhav Naik Viral Video: आमदार वैभव नाईकांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालयच फोडले आहे.

Pramod Yadav

सिंधुदुर्ग: मालवण, सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी लोकापर्ण झालेला शिवरायांचा पुतळा नऊच महिन्यात कोसळल्याने सिंधुदुर्गात राजकारण तापलं आहे.

कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी पुतळ्याच्या नुकृष्ट कामाचा ठपका सार्वजनिक बांधकाम खात्यावर ठेवत विभागाचे कार्यालयचं फोडलं आहे.

गेल्यावर्षी ०४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. शिवरायांचा हा पुतळा मुसळधार पावसामुळे कोसळला.

पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींना संताप व्यक्त केला आहे. आमदार वैभव नाईकांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालयच फोडले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

'पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला ! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार?' असा शब्दात संभाजी महाराज छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे.

तसेच, शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

'सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे', अशी शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली.

'पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे', अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT