Draupadi Murmu Dainik Gomantak
महाराष्ट्र

Presidential Election: द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने दिला पाठिंबा

शिवसेनेतील आदिवासी नेत्यांसह आदिवासी शिवसैनिकांनी मला पत्र लिहून मूर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती.

दैनिक गोमन्तक

Presidential Election: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत माहिती शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील बिघडलेल्या संबंधानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीमुळे भाजप आणि शिवसेनेतील मतभेद वाढले आहेत. (Shiv Sena support NDA candidate Draupadi Murmu)

उध्दव ठाकरे म्हणाले, ''काल झालेल्या खासदारांच्या बैठकीत कोणीही माझ्यावर दबाव आणला नाही. मागील काही दिवसांपासून आम्ही चर्चा करत होतो. शिवसेनेतील (Shiv Sena) आदिवासी नेत्यांसह अनेक आदिवासी शिवसैनिकांनी मला पत्र लिहून मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आता शिवसेना द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देणार आहे.''

दुसरीकडे, गेल्या आठवड्यात पक्षाचे खासदार राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे, एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने यापूर्वी काँग्रेस (Congress) नेत्या प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Bangkok Shooting: कंबोडियासोबत युद्ध सुरु असतानाच थायलंडच्या बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःलाही संपवलं Watch Video

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT