Shiv Sena Dainik Gomantak
महाराष्ट्र

...म्हणून शिवसैनिकांनी त्याला मारहाण केली

चित्रपट संपल्यावर चित्रपटगृहाबाहेर शिवसैनिकांनी मारहाण केली.

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे शिवसैनिकांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही व्यक्ती ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी गेली असता तिला चित्रपटगृहाच्या बाहेरच मारहाण करण्यात करण्यात आली. ही घटना धरणगाव येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील हेमंत द्वितीये यांनी सोशल मीडियावरील (Social Media) जळगाव शहरातील एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या पोस्टमुळे शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली. हेमंत द्वितीये शहरातील आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी आले होते. चित्रपट (Movie) संपल्यावर चित्रपटगृहाबाहेर शिवसैनिकांनी त्यांना बेदम मारहाण केली आणि जाब विचारला.

हेमंत द्वितीये यांच्याकडून शिवसैनिकांनी या पोस्टसंदर्भात माफी मागून घेतली. “माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली. त्याबद्दल मी माफी मागतो” असं म्हणत हेमंत यांनी माफी मागितली.

“ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्रीसाहेबांबद्दल अशी पोस्ट टाकेल त्याला असाच चौकामध्ये चोप दिला जाईल. अशी कोणतीही पोस्ट शिवसेनेच्याबद्दल आणि मुख्यमंत्रीसाहेबांबद्दल कोणी टाकू नये, हे याद राखावं,” असे शिवसेना (Shiv Sena) जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT