शिवसेना भवन: संजय राऊतांचा BJP ला इशारा Dainik Gomantak
महाराष्ट्र

चुकीला माफी नाही; संजय राऊतांचा BJP ला इशारा

जर त्यांच्या खांद्यावरुन भाजप बंदूक चालवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा त्यांनी BJPला दिला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी तोफ डागली. ‘थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये, अशी एकच थप्पड मारू की पुन्हा उठणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला होता. (Shiv Sena MP Sanjay Raut warns BJP)

एका जाहीर सभेमध्ये प्रसाद लाड यांनी शिवसेना (ShivSena) भवन तोडण्याची भाषा केल्यामुळे संतापलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत, जर त्यांच्या खांद्यावरुन भाजप बंदूक चालवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा त्यांनी BJPला दिला आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलतांना 'चुकीला माफी नाही' असं सूचक विधानही राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना केलं आहे.

एकच थप्पड मारू की पुन्हा उठणार नाही!

“अशा प्रकारची विधानं करुन लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपामध्येही या वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त करण्यात आली. शिवसेना भवन ही फक्त इमारत नसून मुंबई आणि अख्ख्या महाराष्ट्राची रक्षणकर्ता असलेली वास्तू आहे. जे स्थान महाराष्ट्रात हुतात्मा स्मारकाला आहे, त्याच भावनेने लोक शिवसेना भवनाकडे बघतात. ती वास्तू बाळासाहेब ठाकरे यांची आहे,” असे वक्तव्य संजय राऊत यांनी माध्यमांसी बोलतांना केले.

दादरमधील भाजप कार्यालयाच्या उद्‍घाटनावेळी लाड यांनी, ‘वेळ आली, तर सेनाभवन फोडू,’ असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर शिवसेना नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनीही लाड यांच्या वक्तव्याची दखल घेतली. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांनी लाड यांनी केलेल्या विधानावर कडाडून हल्ला चढवला.

ते म्हणाले की, आता आम्हाला टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कुणी कौतुक केले की आता भीती वाटते. तो कोणत्या तरी चित्रपटामध्ये संवाद आहे ना, ‘थप्पड से डर नहीं लगता !’ अशा थपडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा दुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ,’ असा इशाराही त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT