Maharashtra CM Uddhav Thackeray slams opposition
Maharashtra CM Uddhav Thackeray slams oppositionDainik Gomantak

CM ठाकरेंचा इशारा; म्हणाले, एकच 'थप्पड' दिली तर पुन्हा उठणार नाहीत

मुंबईत(Mumbai) पार पडलेल्या बीबीडी चाळीच्या(BDD Chawl ) पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे( Uddhav Thackeray) बोलत होते.
Published on

'आम्हाला थप्पड देण्याची कोणी भाषा कोणीही करु नये. आम्ही थप्पड देत पुढे आलो आहोत आणि या पुढेही वेळ पडली तर थप्पड देऊच कारण ही शिवसेना(shivsena) आहे असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना जोरदार चपराक दिला आहे.तर आम्हाला धमकी देऊ नका एकच थप्पड दिली तर तुम्ही पुन्हा उठणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच सगळे म्हणतात तर आज मीही सांगतो होय आमचे ट्रिपलसीट सरकार(Mahavikasaghadi) आहे असे म्हणत विरोधी पक्षाला उत्तर दिले आहे'. मुंबईत(Mumbai) पार पडलेल्या बीबीडी चाळीच्या(BDD Chawl ) पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. (Maharashtra CM Uddhav Thackeray slams opposition)

मी तर स्वप्नही पाहिलं नव्हतं मुख्यमंत्री पदाचं पण मी नशीबवान आहे की, बीबीडी चाळीच्या पुनर्वसानाचं काम माझ्या हातून होत आहे.कारण . माझ्या जन्मापासून या चाळीचा इतिहास आहे आणि आज त्याच्याच विकासकामाला सुरूवात होत आहे ही खरोखरच आनंदाची बातमी आहे कारण या चाळीची पाळमुळं खोलवर रुजली आहेत त्याचबरोबर या चाळीने महाराष्ट्राला अनेक मोठी माणसं दिली आहेत. चाळ संस्कृती आपण मिटू देऊ नका. चाळ हे एक कुटुंब असून चाळीचं वर्णन पु.ल. देशपांडे यांनी त्यांच्या बटाटाच्या चाळीमध्ये केले आहे. या चाळीने अनेक हुत्मात्मे दिले. स्वताची हक्काची घरं झाल्यानंतर आपलं मराठीपण जपा तो कधीही सोडू नका असे आवाहनही मुख्यमंत्र्यानी यावेळी केले आहे.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra CM Uddhav Thackeray slams opposition
ट्विट करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस पोहचताच...

याच कार्यक्रमात बोलताना राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं तोंड भरून कौतुक केले आहे. "आपल्या राज्यावर मोठे संकट येत आहेत, पुरामुळे महाराष्ट्राला मोठे नुकसान झाले मात्र या आस्मानी संकटाला तोंड देताना संकटांवर मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आणि त्यातून पुनर्विकासाची कामगिरी सुरू झाली" असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठ थोपटली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com