महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याभोवती फिरत आहे. याच पाश्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी (Sharad Pawar) पुण्यात बोलत असताना विरोधकांवर हल्लाबोल केला. (Sharad Pawar said that since Nawab Malik is Muslim his name is associated with Dawood Ibrahim)
पवार म्हणाले, 'राज्य सरकारचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची अटक राजकीयदृष्ट्या प्रेरित असून दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) मुस्लिम असल्यामुळे त्यांचे नाव त्याच्याशी जोडले जात आहे.' मलिक यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणीही पवारांनी यावेळी फेटाळून लावली.
दरम्यान, दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात 23 फेब्रुवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने मलिक यांना अटक केली होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, मलिक यांची अटक राजकीय हेतूने प्रेरित आहे. दाऊद इब्राहिम मुस्लिम असल्यामुळे त्यांचे नाव त्याच्याशी जोडले जात आहे. मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जाणूनबुजून छळ केला जात आहे, पण आम्ही त्याविरोधात लढा देऊ.”
तर दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने मलिक यांच्या राजीनामा मागितला आहे, या प्रश्नावर पवार म्हणाले की, मलिक आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत वेगवेगळे मापदंड अवलंबले जात आहेत. विशेष म्हणजे राणे हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.
ते पुढे म्हणाले, "मला आठवत नाही की, माझी कॉंग्रेस नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना नुकत्याच झालेल्या अटकेनंतर राजीनामा द्यावा लागला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) उद्या पुण्यात येत आहेत. याबाबत ते अधिक तपशील देऊ शकतील. राणेंसाठी वेगळे निकष आणि मलिक यांच्यासाठी वेगळे निकष हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येते.''
तसेच, पवारांनी यावेळी बोलताना महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनाही लक्ष्य केले. वर्षभरापूर्वी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने त्यांना पाठवलेल्या विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या नावांना राज्यपालांनी मान्यता दिली नाही.
शिवाय, महाराष्ट्राला पीसी अलेक्झांडरसारख्या राज्यपांलाचा वारसा आहे. सध्याचे राज्यपाल काय करत आहेत यावर मी बोलू इच्छित नाही. केंद्र सरकार (Central Government) शक्य ते सर्व करत आहे आणि महाराष्ट्र हे त्याचे ताजे उदाहरण आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.