बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आणि भाजप आमदार नितेश राणे या दोघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे (Narayan Rane) यांनी सालियन यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली असे म्हटले होते. यावर स्पष्टीकरण देताना महाराष्ट्र (Maharashtra) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, दिशाच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नाही आणि ती गर्भवतीही नव्हती.
दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी तिच्या पालकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, असे चाकणकर म्हणाल्या.
कामाच्या दबावामुळे दिशा मानसिक तणावाखाली होती. त्या वेळी आम्ही तिचा मानसिक ताण समजू शकलो नाही. त्यानंतर अस्वस्थ होऊन तिने आत्महत्या केली, असे सालियनच्या पालकांचे म्हणणे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.