महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यात जाहीर घेत महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला होता. त्यातच आता राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय राजकारणाची सुरुवात झाली आहे, असं राज ठाकरेंनी काल म्हटलं होतं. शरद पवारांना (Sharad Pawar) फक्त जातीय राजकारणाची समीकरणे कशी जुळवायची एवढचं कळतं, असही राज यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता शरद पवार राज ठाकरेंच्या आरोरपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
शरद पवार म्हणाले, ''देशात आजकाल मोठ्याप्रमाणात मानवी हक्कांच उल्लंघन होत चाललं आहे. राज ठाकरेंचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची काही एक गरज नाही. राज ठाकरेंनी काल बोलताना सांगितलं की, मी फक्त फुले, शाहू, अंबेडकर यांचंचं नाव घेतो हे खरं नाही. महाराजांच्या आदर्शाचा पायीक होऊन आपल्या हातातील सत्तेचा कशाप्रकारे वापर करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. मी शिवरायांचं नाव घेत नाही हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. आज खऱ्या अर्थाने महागाईचा प्रश्न आहे. मात्र राज ठाकरेंनी काल जनतेच्या प्रश्नांना पूर्णपणे बगलं दिली.''
शरद पवार पुढे म्हणाले, ''मी पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही हे सांगितल्यानंतर तिथेच प्रश्न संपला होता. मात्र काल राज ठाकरेंनी पंतप्रधान पद ही माझी महत्त्वकांक्षा असल्याचं म्हटलं हे पूर्णपणे असत्य आहे. कॉंग्रेसबरोबर जाण्याची भूमिका आम्ही कधीही बदलेली नाही. काल त्यांनी असही म्हटलं की, मी नास्तीक आहे, परंतु तुम्ही बारामती जाऊन कुणालाही विचारा लोकचं तुम्हाला मी कोण आहे ते सांगतील. प्रबोधनकार ठाकरेंचं लिखाण राज ठाकरेंनी वाचायला हवं एवढचं मी सांगतो. आज सांप्रादायिक विचारांची मांडणी काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातीलं जनतेनं वेळीचं सावध व्हावं. महाराष्ट्रातील मतदारांनीचं राज ठाकरेंना संपवलं. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त काही लक्ष देण्याची गरज नाही.''
पवार शेवटी म्हणाले, ''राज ठाकरेंनी काल केलेल्या भाषणात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक चकार शब्द उच्चारलं नाही, याचा नेमंका अर्थ काय? राज्यातील सामाजिक ऐक्याला राज ठाकरे हानी पोहोचवतं आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचा काही लोकांकडून प्रयत्न केला जात आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला, मग दुसऱ्या दिवशी हा हल्ला का?''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.