Shahu Maharaj  Dainik Gomantak
महाराष्ट्र

अवघे कोल्हापूरकर 100 सेकंद स्तब्ध! लोकराजा शाहू महाराज यांना अनोखी मानवंदना

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापुरात आज दसरा चौक ते शाहू महाराज समाधी स्थळ इथपर्यंत कॅन्डल मार्च काढत लोकांनी त्यांना आदरांजली वाहिली.

दैनिक गोमन्तक

कोल्हापूर: सामाजिक कार्य आणि परिवर्तनसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची आज 100 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने कोल्हापूरकरांनी महाराजांना अनोख्या प्रकारे आदरांजली वाहिली. कोल्हापूरवासीयांनी सकाळी 10 वाजता 100 सेकंदासाठी स्तब्धता पाळली. (Shahu Maharaj death anniversary in Kolhapur)

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापुरात आज दसरा चौक ते शाहू महाराज समाधी स्थळ इथपर्यंत कॅन्डल मार्च काढत लोकांनी त्यांना आदरांजली वाहिली. या कँडल मार्चमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी हजेरी लावली. 100 सेकंद उभे राहून लोक राजाला आदरांजली वाहूया असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.

त्यानिमित्ताने कोल्हापुरातील सर्व व्यवहार 100 सेकंदासाठी थांबवण्यात आले. या वंदन कार्यक्रमात केवळ शहरच नव्हे तर जिल्ह्यातील, राज्यातील, परदेशातील लोकांनी ही सहभाग घेतला. मुंबई येथील पन्हाळा लॉज या ठिकाणी 6 मे 1922 या दिवशी राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai–Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; पोलीसांची दमछाक

Goa Accident: संजिवनी कारखान्याजवळ कार आणि बाईकचा अपघात; दुचाकी चालक जखमी

Goa Rain Update: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

Horoscope: सप्टेंबर महिन्यात 'या' 3 राशींची चांदी! ग्रह-नक्षत्रांची साथ; धनलाभाचे योग

GST on Sports: क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी, सामने पाहणं आणखी महाग होणार, तिकिटांच्या किमतींवर इतका GST आकारला जाणार

SCROLL FOR NEXT