मुंबई: कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी साक्ष नोंदवली. या प्रकरणी शरद पवारांना तिसरं समन्स मिळाले होते. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या जे.एन.पटेल आयोगासमोर शरद पवार यांनी साक्ष दिली आहे. या प्रकरणात आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उडी घेतली आहे. (BJP leader Chandrakant Patil criticizes Sharad Pawar over Bhima Koregaon violence)
शरद पवार यांच्यावर निशाणा साधत चंद्रकांत पाटील म्हणाले, “जाती-जातीमध्ये संघर्ष निर्माण करून त्यांना एकमेकांसोबत लढवायचे हाच उद्योग आयुष्यभर केलेल्या शरद पवारांकडून दुसरी काय अपेक्षा करायची. पवार यांना आपल्या घरावरील हल्ला रोखता आला नाही. पण तेच भाजपवर उलट सुलट आरोप करत आहेत. त्यांच्या प्रमाणे आम्हीही भीमा कोरेगाव प्रकरणी खूप काही बोलू शकतो. प्रत्येक गोष्टीला जातीय रंग देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो," असे पाटील म्हणाले.
भीमा कोरेगाव प्रकरण नेमकं काय ?
1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव येथे दोन गटात हिंसाचार झाला होता. या प्रकरणात संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात भिडे यांच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 41 आरोपीं विरोधात यापूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यात भिडे यांचं नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून मानवी हक्क आयोगापुढे झालेल्या सुनावणी दरम्यान नुकतीच देण्यात आली. संभाजी भिडे यांचा हिंसाचार प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचं आढळून आल्याचं पोलिसांनी मानवी हक्क आयोगापुढे सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.