Vaccination

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

IIT बॉम्बेमधील सात विद्यार्थी पुन्हा कोरोना पॉझिटीव्ह !

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) वसतिगृह तात्काळ सील केले. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात असून त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

मुंबई: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेमधील सात विद्यार्थ्यांचे कोरोना रिपोर्ट सोमवारी पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सातही विद्यार्थ्यांचे पूर्णपणे लसीकरण (vaccination) झाले होते. या सातही जणांना सौम्य लक्षणं जाणवल्यामुळे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) वसतिगृह तात्काळ सील केले. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात असून त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

आजच्या सुरुवातीला, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून चेतावणी दिली आहे की, ओमिक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा (delta variant) तिप्पट संक्रमणशील आहे.

"ओमिक्रॉन (omicron variant) डेल्टा पेक्षा कमीत कमी 3 पट जास्त वेगाने प्रसारित होतो. म्हणूनच, स्थानिक आणि जिल्हा स्तरावर अधिक दूरदृष्टी, डेटा विश्लेषण, डायनॅमिक निर्णय घेणे आणि कठोर आणि त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या, महाराष्ट्रात ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे 65 आहेत, त्यानंतर दिल्ली (54), तेलंगणा (20) आणि कर्नाटक (19) आहेत. मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत भारतात 5,326 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आणि 453 मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय प्रकरणे 79,097 आहेत, जी 574 दिवसांतील सर्वात कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT