Police Dainik Gomantak
महाराष्ट्र

क्रिप्टोकरन्सीचा मोह पडला महागात, पोलिस हवालदारासह 7 जण गजाआड

एका क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) व्यापाऱ्याचे अपहरण करुन बिटकॉइनच्या खंडणीसाठी 40 दशलक्ष डॉलर्सची मागणी केल्याप्रकरणी एका पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

एका क्रिप्टोकरन्सी व्यापाऱ्याचे अपहरण करुन बिटकॉइनच्या खंडणीसाठी 40 दशलक्ष डॉलर्सची मागणी केल्याप्रकरणी एका पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह अन्य 7 जणांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईनंतर महाराष्ट्रातील (Maharashtra) दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या पुण्यातील (Pune) दिलीप तुकाराम खंदारे (Dilip Tukaram Khandare) यांना त्यांच्या शहरातील एका व्यक्तीकडे बिटकॉइनचे मोठे पाकीट असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर बिटकॉइन (Bitcoin) वॉलेटच्या मालकाचे अपहरण करण्याची योजना त्यांनी आखली. (Seven Arrested For Kidnapping Cryptocurrency Trader And Demanding 40 Million For Bitcoin Ransom)

दरम्यान, दिलीप तुकाराम याने 38 वर्षीय विनय नाईक यांचे 14 जानेवारी रोजी काही सहकारी सूत्रधारांसह अपहरण केल्याचा आरोप आहे. दिलीपने विनयकडे त्याचे तीन अब्ज रुपये ($40 दशलक्ष) डिजिटल चलन देण्याची मागणी केली. यासोबतच त्याच्याकडे असलेल्या आठ लाख रुपयांचीही मागणी केली.

तसेच, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे अपहरणकर्त्यांना समजताच दुसऱ्याच दिवशी विनय नाईक यांची अचानक सुटका करण्यात आली आणि मंगळवारी सूत्रधारांना अटक करण्यात आली.

शिवाय, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माध्यमाशी बोलताना सांगितले की, आम्ही एका पोलीस हवालदारासह आठ जणांना अटक केली आहे. अनेक क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म भारतात आले आहेत. परंतु तरीही भारतातील बहुतेक ठिकाणी ते अनियंत्रित आहेत. क्रिप्टोवर 2018 मध्ये बेकायदेशीर मनी ट्रान्सफर प्रकरणी बंदी घालण्यात आली होती, परंतु 2 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ही बंदी उठवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT