Gatari Amavasya Dainik Gomantak
महाराष्ट्र

श्रावणाआधी Gatari Amavasya साजरी करण्यामागील वैज्ञानिक कारण माहिती आहे का?

श्रावणात मांसाहार वर्ज्य करण्याच्या धार्मीक नियमांमागील वैज्ञानिक कारण काय आहे? याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो

दैनिक गोमन्तक

Gatari Amavasya 2022 in Maharashtra: महाराष्ट्रातील मराठी दिनदर्शिकेनुसार गटारी अमावस्या आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते. शास्त्रानुसार श्रावण महिन्यात पुढील 40 दिवस मद्यपान व मांसाहार वर्ज्य करावे लागते म्हणून ही गटारी अमावस्या साजरी केली जाते. पारंपारिक मराठी महिन्यात, अमावस्या हा शेवटचा दिवस असतो ज्या दिवशी बहुतेक लोक मांसाहार करतात. यावेळी गटारी अमावस्या 28 जुलै 2022 रोजी साजरी होणार आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. 29 जुलै 2022 पासून भगवान शिवाच्या उपासनेचा महिना श्रावण सुरू होणार आहे. शिवभक्त या पवित् श्रावणात शास्त्रानुसार घालून दिलेले विधी आणि प्रथा पाळतात. श्रावणात मांसाहार व मद्याचा त्याग करून ते सात्विक भोजन करतात.

गटारी अमावस्येनंतर श्रावण सुरू होते. त्यानंतर लोक मांसाहार, मादक पेये आणि कांदे आणि लसूण यांसारखे तामसिक पदार्थ खाणे वर्ज्य करतात. त्यामुळे महिना सुरू होण्यापूर्वीच लोक मांसाहार करून श्रावणातील सर्व प्रथा पाळण्याची तयारी करतात. हा दिवस महाराष्ट्रात गटारी अमावस्या म्हणून साजरा केला जातो.

अमावस्या कधी पासून कधी पर्यंत

कृष्ण पक्ष अमावस्या तिथी सुरू होईल - 27 जुलै रात्री 09:12 वाजता

कृष्ण पक्ष अमावस्या संपेल - 28 जुलै रात्री 11.24 पर्यंत

गटारी अमावस्याचे महत्व

श्रावणाच्या स्वागतासाठी मराठी लोक गटारी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अमावस्या हा पारंपारिक मराठी महिन्यातील शेवटचा दिवस आहे. आणि हिच अमावस्येची रात्र गटारी अमावस्या म्हणून ओळखली जाते. गटारीच्या दिवशी, लोक रात्रीच्या वेळी त्यांच्या जवळच्या मित्रांसह आणि प्रियजनांसह स्वादिष्ट मांसाहारी अन्न आणि मद्याचा आनंद घेतात.

गटारी अमावस्या साजरी करण्यामागील वैज्ञांनिक कारण

गटारी अमावस्या साजरी करण्यामागचे कारण पाहिले तर श्रावण महिन्यात आजारांचा धोका जास्त असतो. कारण हा महिना पावसाळ्यात येतो. त्यामुळे या महिन्यात लोकांना हलके अन्न खाणे आवडते. त्याचबरोबर पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात होता. त्याचबरोबर हे आजार पाण्यातून आणि अन्नातून पसरतात. त्यामुळे देशातील असो वा राज्यातील आरोग्य यंत्रणा जनतेला बाहेरचे खाणे टाळण्याचा, कोमट पाणी पिण्याचा आणि उघड्यावरचे अन्न खाणे टाळण्याचा सल्ला देते. त्याचबरोबर बदलत्या वातावरणानुसार खाण्या पिण्याच्याही पद्धती बदलतात. म्हणून श्रावणाच्या आधी ही गटारी अमावस्या साजरी केली जाते. त्यानंतर महिनाभर आरोग्याच्या काळजीसाठी मासांहार, कांदा-लसूणसारखे मसालेदार पदार्थ खाणे टाळले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

Rohit Sharma: 'मला घरी बोलावलं, अर्धा तास माझ्यासोबत...' रोहित शर्माबाबत स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; सांगितली संपूर्ण कहाणी

GST Collection: गोव्यात पाच महिन्यांत 1,143 कोटींचा जीएसटी जमा; 20,960 सक्रिय करदाते, कॅसिनोंबाबतही मोठी स्पष्टता

Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT