'सुख म्हणजे नक्की काय असतं'द्वारे घराघरात पोहोचलेले अभिनेते अरविंद धनू अनंतात विलीन

वयाच्या 47 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला
Actor Arvind Dhanu die
Actor Arvind Dhanu dieDainik Gomantak

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते तसेच स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अरविंद धनू यांचं निधन झालं आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याचं निमित्त झाले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामूळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

(Actor Arvind Dhanu dies of brain hemorrhage )

Actor Arvind Dhanu die
Priyanka, Nick दुसऱ्या मुलासाठी करताहेत प्लॅन? मुलगी मालतीसाठी घेतला हा निर्णय

अरविंद धनू यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकलाकार आणि सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केलाय. अरविंद यांच्यावर माहीम येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अरविंद यांनी ‘लेक माझी लाडकी’, ‘क्राईम पेट्रोल’ अशा अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘एक होता वाल्या’ या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केलं होतं.

Actor Arvind Dhanu die
Amruta khanvilkar: रातरंगीन चांदण्यात 'चंद्राचा' गोल्डन ग्लॅमर

‘सुख म्हणजे काय असतं’ ठरली शेवटची मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे काय असतं’ ही अरविंद यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत अरविंद यांनी शालिनीच्या वडीलांची भूमिका साकारली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच 'भाबी जी घर पर हैं' मालिकेतील अभिनेता दीपेश भान याचंही निधन झालं होतं.

प्रेक्षक आणि चाहत्यांचं मनोरंजन करणारा दीपेश शनिवारी क्रिकेट खेळताना अचानक कोसळला आणि त्याने या जगाचा निरोप घेतला. नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळायला गेलेला दीपेश मैदानावरच कोसळला. त्याचे ब्रेन डेड झाल्याचं निदान झालं. पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा असा त्याचा परिवार एकाकी पडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com