Sanjay Raut twit on Mamata Banerjee Aditya Thackeray meet  twitter @rautsanjay61
महाराष्ट्र

ममता बॅनर्जी,आदित्य ठाकरेंची मुंबईत भेट आणि संजय राऊतांचं ट्विट

ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरेंना भेटल्या नसतील, पण त्यांनी मुंबईत शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीत राजकारणावर चर्चा केली आहे.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मुंबईत मंगळवारी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. सीएम ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या दौऱ्यावर मुंबईत आल्या आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दीदींना त्यांची भेट घेता आली नाही.दुसरीकडे, ममता बॅनर्जी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जी काँग्रेसपासून अंतर ठेवून प्रादेशिक पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा शरद पवार यांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.(Sanjay Raut twit on Mamata Banerjee Aditya Thackeray meet)

आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी ३० नोव्हेंबरला मुंबईला भेट देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितले की, 'मी 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत मुंबई दौऱ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहे.'

ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरेंना भेटल्या नसतील, पण त्यांनी मुंबईत शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीत राजकारणावर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांचे मुंबई आणि महाराष्ट्रात स्वागत केले. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.

ममता यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह आज मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यावेळी आपले राजकारण आणि बंगाल-महाराष्ट्र संबंधांवर चर्चा झाली. त्यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांनी सिद्धिनायक मंदिरात जाऊन उद्धव ठाकरेंच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे सुप्रीमो बोलणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

SCROLL FOR NEXT