Sanjay Raut News Dainik Gomantak
महाराष्ट्र

मंडीमे माल बिकने को तैयार था, बस हमने खरीदा नही : संजय राऊत

पक्षाने तुम्हाला पद दिले, मान दिला. तरी तुम्ही बंड केला : राऊत

Akash Umesh Khandke

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेला राजकीय गदारोळ अखेर शेवटच्या पर्वात पोहोचला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बुधवारी रात्री 11 च्या सुमरास मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला. ठाकरेंनी पदभार सोडल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. परिणामी शिंदे गट आणि भाजप एकत्र येण्याचा मार्ग मोकळा झाला. (Sanjay Raut News)

महाविकास आघाडी सरकार स्थापनेत मोलाचा वाटा असलेले संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज प्रसार माध्यमांसमोर आले. दरम्यान, राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. तुम्हाला शिवसेनेने काय कमी केले ? पक्षाने तुम्हाला पद दिले, मान दिला. तरी तुम्ही बंड केला, अशा शब्दात राऊतांनी बंडखोर आमदारांना खडसावले.

भाजप बरोबर युतीत असताना याच लोकांनी भाजप शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप केला होता. एकनाथ शिंदे यांनी तर त्याग पत्र दिले होते. त्याचे काय झाले ? हेच शिंदे आता भाजप बरोबर सरकार स्थापन करण्यास उत्सुक आहेत. त्यांनी कारणे देणे थांबवावे. त्यांनी आपला मार्ग निवडला आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. मात्र, तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळणार आहे का ? ते तुम्हाला शिवसेनेतच मिळणे शक्य होते, असे देखील राऊत म्हणाले.

मंडीमे माल बिकने को तैयार था, बस हमने खरीदा नही, हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाक्याचा उल्लेख करत राऊत यांनी बहुमत सिद्ध करण्यास का नकार दिला याचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, आमदारांनी खुशाल सरकार स्थापन करावे. आम्हाला त्यात रस नाही, असे संजय राऊत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: भारतानं पाकिस्तानविरूध्दच्या मॅचवर बहिष्कार टाकला तर? गुणतालिकेत उलथापालथ निश्चित, पाकचा राहील वरचष्मा

Viral Video: 'मनोहर पर्रीकर फिरायचे तसे तुम्हीही फिरत जा'; पुण्यात पाहणी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना महिलेचा सल्ला Watch Video

Socorro: मान्सूनच्या आगमनापासून वेगवेगळे रंग धारण करणारे 'सुकूर पठार'

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

Bits Pilani: 'बिट्स पिलानी मृत्यूप्रकरणी SIT नेमा'! NSUI ची मागणी; कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT